नोटा मोजत असलेल्यांचे "ते' शोधायचे सावज, आणि मग दाखवायचे "हात'...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व ग्रामीण जनतेचे बॅंकिंग व्यवहार सुरू झाले आहेत. बॅंकांमध्ये गर्दी होत आहे. बॅंकिंग व्यवहार करीत असताना साध्या-भोळ्या जनतेला नियम व कायद्यांचे असलेले कमी ज्ञान व त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बोलून फसवेगिरी करीत नोटा लंपास करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे.

नागपूर ग्रामीण : तुमच्या हातातील नोटांना श्‍याई लागली आहे. बॅंकेत अशा नोटा घेतल्या जात नाहीत. उलट तुमच्यावरच कारवाई होईल. तुमच्या नोटा मी मोजून देतो, असे काहीबाही सांगून ग्रामीण भागातील जनतेच्या साधेपणाचा फायदा घेत ते हातचलाखी करून पैसे लंपास करण्याचा गोरखधंदा करणा-यांना ग्रामीण पोलिसांनी अखेर जेरबंद केले.

आणखी वाचा : लॉकडाउन शिथिल करणे नागपुरला पडले महागात, वाचा सविस्तर

बॅंकेसमोर उभे राहून "ते' शोधायचे संधी
बॅंकिंग व्यवहाराच्या अपुऱ्या ज्ञानाचा गैरफायदा घेत ग्रामीण जनतेला लुटले जात असल्याच्या घटना घडत आहेत. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत जनतेला लुटणाऱ्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही टोळी ग्रामीणांना बॅंकेत नोटांना शाई लागली आहे, अशा नोटा बॅंकेत घेतल्या जात नाही किंवा तुमच्याकडील काही नोट नकली आहेत. त्यामुळे तुमच्यावर कार्यवाही होईल, असा धाक दाखवून संधी मिळताच ग्रामीण खातेदाराच्या हातून संधी साधून नोटा लंपास करण्यात ही टोळी पटाईत होती. या टोळीने काही आठवड्यात नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह, भंडारा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत जनतेला हातचलाखी करून लुटले. नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तिघांना शहरातून अटक केली.

हेही वाचा : "मुंबई रिटर्न' वृद्‌धाचा अहवाल मिळाला पॉजिटिव्ह, पण मृत्यू झाल्यानंतर, मग घडले असे...

"साहेबी' आवेशात बोलून पाडायचे प्रभाव
सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी व ग्रामीण जनतेचे बॅंकिंग व्यवहार सुरू झाले आहेत. बॅंकांमध्ये गर्दी होत आहे. बॅंकिंग व्यवहार करीत असताना साध्या-भोळ्या जनतेला नियम व कायद्यांचे असलेले कमी ज्ञान व त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बोलून फसवेगिरी करीत नोटा लंपास करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. या टोळीतील अनेक सदस्य गर्दी असलेल्या बॅंकेत आडोशाला उभे राहून निरीक्षण करीत असतात. अनुकूल संधी मिळताच नोटा मोजताना पाहून शेतकऱ्याला सावज म्हणून टिपले जाते. त्याच्याशी साहेबी आवेशात बोलून त्याच्यावर प्रभाव दाखवून त्याचे पैसे लंपास केले जाते.

हेही वाचा : सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्यास 24 तासांत कळवा, कोण म्हणाले असे,...

काटोल, रामटेक, कळमेश्‍वर तालुक्‍यात अनेकांना बनविले
नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने आतापर्यंत जिल्ह्यात काटोल, रामटेक, कळमेश्‍वर, सक्‍करदरा या ठिकाणी बॅंक ग्राहकांना फसविल्याच्या घटना घडल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील नागभीड येथे अशीच फसवणूक करण्यात आली. अशा अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी या टोळीवर पाळत ठेवली. सुरवातीला या टोळीतील मो. शेख रफिक याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मोहसीन रजा गुलाम रजा आणि हैदरअली या सदस्यांनाही अटक केली. विशेष म्हणजे मराठवाड्यात काही जिल्ह्यांत चॅन स्नॅचिंगसह अनेक गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.

हेही वाचा : व्वारे प्रशासन ! अगोदर केले खोलीकरण, नंतर काढल्या निवीदा, मग केली सारवासारव.

ग्रामीण पोलिसांचे आवाहन
अशा वाढत्या घटना लक्षात घेता, जनतेने बॅंकिंग व्यवहार करताना कोणत्याही अनोळखी माणसावर विश्‍वास ठेवून आपल्याकडील रक्‍कम त्यांच्या हातात देऊ नये, पैशाबाबत सावधान राहावे, असे आवाहन नागपूर ग्रामीण पोलिसांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang looting villagers arrested