esakal | आधी करायचे चेनस्नॅचिंग नंतर विकायचे गाडी; चार राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला अखेर अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

Police arrested famous chain snatching gang

पोलिसांच्या माहितीनुसार, चेनस्नचिंगची विशिष्ट पध्दत असलेल्या ईराणी टोळीचा हैदोस शहरात सुरू होता. शहरात अनेक ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढण्याचे प्रकार वाढले होते. मात्र

आधी करायचे चेनस्नॅचिंग नंतर विकायचे गाडी; चार राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला अखेर अटक 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर :  महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यासह जवळपास चार राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या चेनस्नॅचींग करणाऱ्या ईराणी टोळीला गुन्हे शाखा पोलिसानी कोल्हापूर जिल्ह्यातून जेरबंद केले. या टोळीकडून पोलिसांना ५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील टोळीमध्ये सात आरोपींचा समावेश असून त्यांनी आतापर्यंत केलेल्या २५ गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चेनस्नचिंगची विशिष्ट पध्दत असलेल्या ईराणी टोळीचा हैदोस शहरात सुरू होता. शहरात अनेक ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढण्याचे प्रकार वाढले होते. मात्र चतूर असलेली ही टोळी नेहमी पोलिसांना गुंगारा देत होती. पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांची पथके या टोळीच्या मागावर होती. 

मासे खाणाऱ्यांनो, तुमच्यासाठी खास बातमी! अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक

१३ ऑगस्टला शांतीनगरातील दहीबाजार पुलावर एका महिलेची सोनसाखळी या टोळीने लंपास केली. त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना शेवटी गुन्हे शाखेला या टोळीची लिंक मिळाली. पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले शहराजवळ या टोळीला सापळा रचून अटक केली. 

हैदर अली युसूफ अली (३०), मोसीन रजा गुलाम रजा (३२), युसूफ अली अमीर अली (३७) तिन्ही राहणार डीबी कॉलनी न्यु कामठी, आसीम अली मेंहदी अली (५२), शबीर सलीम अली (३४), नादीर तालीब जैदी (४८) तिन्ही राहणार येरखेडा, न्यु कामठी आणि मोहम्मद आवेश मोहम्मद शाहीद (१९) रा. जुनी कामठी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असा लागला छडा

गुन्हे शाखेचे चेनस्नॅचिंग विरोधी पथक तपास करीत असताना मोसीन रजा याच्यासह इतर आरोपींचा मोबाईल क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. लोकेशन वरून पोलिसांनी बऱ्हाणपूर खांडवा मध्यप्रदेश, शहापूर, धुळे, मालेगांव, नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर या ठिकाणी पोलिसांनी सतत आरोपींचा पाठलाग केला. लोकेशनची माहिती होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी हातकंनगले, कोल्हापूर येथून हैदर, मोसीन, युसूफ आणि आसीफ या चौघांना अटक केली. त्यांच्या सांगण्यावरून इतर तिघांच्याही मुसक्या आवळल्या. 

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?, चक्क कपाशीच्या शेतात घेतले गांजाचे पीक

या टोेळीने विविध राज्यासह महाराष्ट्रातही अनेक गुन्हे केले असून त्यांनी २५ चेनस्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून ५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्यासाठी ही टोळी दुचाकी आणि चार चाकीचा उपयोग करीत होती. गुन्हे केल्यानंतर  गाड्या दुसऱ्यांना विकत होती.

संपादन - अथर्व महांकाळ