१२ लाख मतदार निवडणार गावाचे कारभारी, यवतमाळमध्ये ९८० ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी

12 lakh voters for grampanchayat election in yavatmal
12 lakh voters for grampanchayat election in yavatmal

यवतमाळ : जिल्ह्यातील एक हजार 207 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 980 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी (ता.15) मतदान होऊ घातले आहे. यासाठी दोन हजार 832 मतदान केंद्र सज्ज करण्यात येत आहेत. या ग्रामपंचायतींसाठी 12 लाख 30 हजार 162 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून आपापल्या गावांचे कारभारी ठरविणार आहेत.

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. 80 टक्के ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी होऊ घातल्या आहेत. त्यामुळे जिल्हाभरच सध्या ग्रामीण भागातील राजकारण सुरू आहे. तब्बल 980 ग्रामपंचयातींत तीन हजार 71 प्रभाग आहेत. त्यामधून जवळपास आठ हजार उमेदवारांना विजयी करून ग्रमापंचायतींत पाठविण्यात येणार आहे. यासाठी साम-दाम-दंड-भेद ही व्यूहरचना आखली जात आहे. मतदानासाठी अखेरचे काही तास उमेदवारांच्या हातात आहेत. त्यामुळे सर्वांनी "जोर' लावला आहे. 

जिल्ह्यात 15 जानेवारीला दोन हजार 832 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. एकूण 980 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणारे तब्बल 12 लाख 30 हजार 162 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात पाच लाख 92 हजार 572 स्त्री, तर सहा लाख 37 हजार 582 पुरुषांचा समावेश आहे. इतर आठ मतदार ग्रामपंचयात निवडणुकीत मतदान करणार आहेत. पुसद तालुक्‍यात सर्वाधिक 105 ग्रामपंचायतींच्या निवडणूक होणार आहे. यासाठी एक लाख 55 हजार 758 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. महागाव तालुक्‍यात एक लाख 11 हजार 161, उमरखेड एक लाख 18 हजार 891 तर दारव्हा तालुक्‍यात एक लाख 667 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. मतदान साहित्य तहसीलस्तरापर्यंत पोहोचविण्यात आलेले आहेत. या ठिकाणी मतदान यंत्रांची तपासणी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. 

दोन हजार 832 मतदन केंद्र -
जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींसाठी दोन हजार 832 मतदान केंद्रे असणार आहेत. त्यात यवतमाळ तालुक्‍यात 198, बाभूळगाव 146, आर्णी 198, नेर 150, दारव्हा 224, दिग्रस 148, पुसद 298, महागाव 223, उमरखेड 247, घाटंजी 149, केळापूर 122, झरी जामणी 115, वणी 223, मारेगाव 88, कळंब 165, राळेगाव 138 मतदान केंद्रे असणार आहेत.

तालुकानिहाय मतदारांची संख्या -

तालुका मतदार
यवतमाळ 79,682
बाभूळगाव 56,218
आर्णी 84,828
नेर 70,065
दारव्हा 100,667 
दिग्रस 74,483
पुसद 1,55,758
महागाव 1,11,161
उमरखेड 1,18,891
घाटंजी 66,897
केळापूर 49,472
झरी जामणी 41,980
वणी 79,444
मारेगाव 27,944
कळंब 60,877
राळेगाव 51,795

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com