esakal | रेड झोनमधून परतलात तर  होणार गावबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवासी संस्थात्मक अलगीकरणात
sakal

बोलून बातमी शोधा

akola If we return from the red zone, there will be village closures, migration in Zilla Parishad schools and institutional segregation

कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आवागमनास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. असे असले तरी परजिल्ह्यात काही कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नुकतेच अटी-शर्तींवर अकोला जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे.

रेड झोनमधून परतलात तर  होणार गावबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवासी संस्थात्मक अलगीकरणात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  : कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आवागमनास प्रतिबंध लावण्यात आले आहेत. असे असले तरी परजिल्ह्यात काही कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नुकतेच अटी-शर्तींवर अकोला जिल्ह्यात प्रवेश देण्यात आला आहे.

त्यापैकी १८४४ प्रवासी हे कोरोना विषाणूमुळे रेड झोन जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. संबंधित प्रवाशांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले असून अलगिकरणाचा कालावधी पूर्ण होई पर्यंत त्यांना गावांमध्ये फिरण्यास बंदी लावण्यात आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे मुंबई, पुणे, नागपूर यासह इतर जिल्ह्यातून व परप्रांतातून नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. संबंधित नागरिक शिक्षणासह उदरनिर्वाह किंवा नोकरीसाठी इतर ठिकाणी गेले होते. परंतु संबंधित नागरिक ज्या गावातून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्याठिकाणी कोरोना विषाणूने अनेक नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे अशा नागरिकांना सुद्धा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्या सोबतच इतर नागरिकांना सुद्धा त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता आहे. परिणामी अशा नागरिकांची जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा - अरे देवा! कोविडने पळविली विकासाची चतकोर; डीपीसीला 156 कोटी पैकी मिळणार केवळ...

तपासणीदरम्यान संशयित आढळणाऱ्या व्यक्ती अलगीकरणात ठेवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रेड झोन मध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात परतलेल्या १८४४ प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून परतलेल्या ३१६ नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यासोबतच परप्रांतातून आलेल्या १५८ नागरिकांना सुद्धा संस्थात्मक अलगीकरणात
ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी खंडित होण्यास मदत होईल, असा दावा आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.

हेही वाचा - Video : साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असता तर, आमच्यावर ही वेळ आली नसती; चक्क पोलिस कर्मचाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्या समोर...


असे आहेत रेड झोन मधून परतलेले प्रवासी
कोरोना विषाणूमुळे रेड झोन मध्ये समावेश करण्यात आलेल्या जिल्ह्यातून परतलेल्या १८४४ प्रवाशांपैकी सर्वाधिक ४६६ प्रवासी बार्शिटाकळी तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर मूर्तिजापूर तालुक्यात २८०, बाळापुर व पातुर तालुक्यात २७३, अकोला तालुक्यात २१७, अकोट मध्ये १६४ व तेल्हारा तालुक्यात १७१ प्रवासी परतले आहेत. 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

बुलडाणा जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

वाशीम जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

loading image