
अंधश्रध्येचे भूत डोक्यात घालून विवाहितेवर अत्याचार
यवतमाळ : अंधश्रध्येचे (Superstition) भूत डोक्यात घालून विवाहितेवर अत्याचार केल्याची (Atrocities on married women) घटना यवतमाळ येथे घडली. या धक्कादायक घटनेची तक्रार सोमवारी (ता. ३१) यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, महिला दीड वर्षापासून दोन मुलींसह माहेरी राहत आहे. अदिलाबाद येथील नातेवाइक महिलेच्या नातेवाइकांकडे येत होता. त्यामुळे त्याच्यासोबत परिचय झाला. महिलेची मानसिकता ठीक नसल्याची बाब नातेवाइकांच्या लक्षात आली. त्यावरून नातेवाइकाने शेखर अन्ना (वय २८, रा. खुरशीदनगर, अदिलाबाद) या मित्राची माहिती दिली. तो एक तांत्रिक असल्याचे सांगितले. त्यानंतर २३ जानेवारीला युवकाने शेखर अन्नाला उपचार करण्यासाठी घरी आणले. त्याच्यासोबत मित्र शाहरुख (वय २५) व निसार (वय २६, दोघेही रा. अदिलाबाद) हे सुद्घा सोबत आले होते.
हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळेंकडे कोट्यवधींचा काळा पैसा; नातेवाइकाचा आरोप
मांत्रिकाने अंगातील भूत काढण्यासाठी मंत्र म्हणून लिंबू कापून उपचार करण्याचे नाटक सुरू केले. चार ते पाच दिवस हा प्रकार चालला. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता मांत्रिकाच्या बोलण्यात येऊन नातेवाइकांनी महिलेला एकटे सोडले व निघून गेले. त्यानंतर भूत काढण्याचे नाटक करून बळजबरीने मांत्रिकाने अत्याचार (Atrocities on married women) केला.
तसेच याबाबत कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी तिघेही आदिलाबादला निघून गेले. महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. अंधश्रद्घा (Superstition) लादून अत्याचार केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात देण्यात (Accused Absconded) आली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा: मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा
म्हणे, सैतान मेरेसे बहूत शक्तिशाली
२८ जानेवारीला दुपारी मांत्रिकाने घरातील लोकांना ‘सैतान मेरेसे बहुत शक्तिशाली है, सैतान को निकालना है तो आज के रात अकेला छोडना पडेगा, नही तो सैतान के वजह से किसी को कुछ हो गया तो उसकी जिम्मेदारी मै नही लूंगा’ अशी भीती दाखविली. पीडितेला त्याच्याकडे रात्रीला सोडण्यासाठी नातेवाइकांवर मांत्रिक दबाव आणला आणि अत्याचार केला.
Web Title: Atrocities On Married Women Superstition Crime News Accused Absconded Yavatmal District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..