बैलाविना फावड्याला पास लावून डवरणीचा शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

विरेंद्रसिंग राजपूत
सोमवार, 10 जुलै 2017

नांदुरा (बुलढाणा) : मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील सखाराम गोविंदा हिंगे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन या पिकात बैलविना डवरणीचा अनोखा प्रयोग करून इतरांसाठीही आदर्श निर्माण केला आहे.

नांदुरा (बुलढाणा) : मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील सखाराम गोविंदा हिंगे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन या पिकात बैलविना डवरणीचा अनोखा प्रयोग करून इतरांसाठीही आदर्श निर्माण केला आहे.

सखाराम हिंगे यांचेकडे कोरडवाहू शेती असून, सध्या शेतीमशागतीच्या कामांना वेग आला आहे. अशातच इतरांना बैल मागावे तर बैल मिळत नाही. याकरिता त्यांनी अफलातून शक्कल लढवून घरी असलेल्या टाकाऊ फावड्याला कापून त्याला खाली पास बसेल असे बनवून चक्क हाताने स्वतः ओढले जाईल असे बनविले. कुणाचाही आधार न घेता डवरणी करण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वीही ठरलेत. यामधून होईल तेवढे काम यातून मार्गी लागत असून, सोयाबीन पीक तण विरहित होत आहे, असे ते सांगतात. दिवसभर निंधन करूनही जेवढे काम होत नाही ते यातून होत आहे. बैल नसतानाही स्वतः मेहनत करून वेगळे काही तरी करण्याची मानसिकता असली की मार्ग सापडतोच हेच यातून दिसून येते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​

Web Title: buldhana news