सिगरेटच्या झुरक्यावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला सुनावले

धूम्रपान कायदा पायदळी तुडवत काँग्रेसचे ‘दम मारो दम..’ सुरूच आहे
Chitra Wagh
Chitra Wagh Chitra Wagh

नागपूर : महापालिकेची ऑनलाइन सभा शनिवारी पार पडली. या सभेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे बोलत असताना त्यांच्याच पक्षाचे सदस्य रमेश पुणेकर सिगरेटचे झुरके (Cigarettes) मारताना आढळले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची वाइनची नशा उतरत नाही तोवर नागपूर पालिकेच्या ॲानलाइन सभेत काँग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर यांनी सिगरेट ओढत बेफिक्रीपणाचा दाखलाच दिलाय, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली.

कचरा संकलन करणारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया कंपनीचा कंत्राट रद्द करणे, नव्या कंपनीची नियुक्ती करणे यावर महापालिकेची विशेष सभा ऑनलाइन पार पडली होती. सभेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे या कंपन्यांकडून होणारा अटीचा भंग, नियमाची पायमल्ली आदींवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्याच कॉंग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक रमेश पुणेकर सिगरेट (Cigarettes) ओढताना स्क्रीनवर दिसून आले.

Chitra Wagh
मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

पुणेकर सिगरेट ओढताना काही नगरसेवकांनी बघितले. परंतु, कुणीही सभेदरम्यान त्यांच्यावर ताशेरे ओढले नाही. नेमके याचवेळी कुणीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हे रेकॉर्डिंग सायंकाळपर्यंत अनेकांच्या मोबाईलवर दिसून आले. महापालिकेची सभेसाठी उपस्थित राहताना धूम्रपान आदी न करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या परंपरेलाही पुणेकर यांच्या कृत्याने तडे गेले आहे.

या प्रकरणावर मंगळवारी (ता. १) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची वाइनची नशा उतरत नाही तोवर नागपूर पालिकेच्या ॲानलाइन सभेत काँग्रेस (Congress) नगरसेवक रमेश पुणेकर यांनी सिगरेट ओढत बेफिक्रीपणाचा दाखलाच दिलाय. धूम्रपान कायदा पायदळी तुडवत काँग्रेसचे ‘दम मारो दम..’ सुरूच आहे. या काँग्रेस नगरसेवकावर कारवाई तात्काळ करा, अशी मागणी त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com