मुख्यमंत्र्यांच्या 'नाईट सफारी'ला केंद्राचा कोलदांडा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

भाजप सरकारने गोरेवाडा जंगलात इंडीयन सफारी व नाईट सफारी करण्याचा प्रस्ताव तयार केला. कोणत्याही राखीव जंगलात 'सफारी' सुरू करण्यासाठी वन संरक्षण कायद्यानुसार केंद्राच्या वन मंत्रालयाची रितसर पूर्वपरवानगी घ्यावी लागते. यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच दोन्ही सफारींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.

नागपूर - नागपूरलगत असलेल्या गोरेवाडा जंगलात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'इंडीयन सफारी' व 'नाईट सफारी' सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न भंग होण्याची शक्‍यता आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडून दोन वर्षांपासून रोखून धरला आहे. त्यामुळे या फडणवीस सरकारचा हा प्रकल्प मूर्त स्वरुपात येईल किंवा कसे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूरच्या आजूबाजूला जवळपास तेरा 'टायगर प्राॅजेक्‍ट' आहेत. त्यामुळे नागपूरला 'टायगर कॅपिटल' करण्याचा चंग काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केला होता. तत्कालिन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी नागपुर 'टायगर कॅपिटल' करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने गोरेवाडा जंगलात इंडीयन सफारी व नाईट सफारी करण्याचा प्रस्ताव तयार केला. कोणत्याही राखीव जंगलात 'सफारी' सुरू करण्यासाठी वन संरक्षण कायद्यानुसार केंद्राच्या वन मंत्रालयाची रितसर पूर्वपरवानगी घ्यावी लागते. यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वीच दोन्ही सफारींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.

केंद्रातील मोदी सरकारने फडणवीस सरकारच्या या प्रस्तावाची दोन वर्षांपासून दखलच घेतलेली नाही. नुकतेच दिवंगत झालेले अनिल माधव दवे नागपुरात आले तेव्हाही हा विषय चर्चेत आला होता. पर्यावरणाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असलेल्या अनिल दवे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेवाडयातील इंडीयन व नाईट सफारी 2018 पूर्वी पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. परंतु, केंद्राची परवानगी मिळेपर्यंत ही नाईट सफारी सुरू करता येणार नाही, हे स्पष्ट आहे. याची निविदा काढली असून काही निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, वन खात्याची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याने हे कंत्राट अद्यापही कुणालाही देण्यात आलेले नाही.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
शिरुर: विनयभंग प्रकरणी महाराजाला मंदिरातून अटक​
तेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

राज्यातील पाच स्थळांना मिळणार जैवविविधता वारसाचा दर्जा
मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार
समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cm night safari project trouble