esakal | अमरावतीत कोरोना लस पोहोचली, पाच केंद्रांवर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine reached in amravati

लस घेऊन येणारे वाहन अकोल्याहून काल रात्री दोन वाजता जिल्ह्यात येऊन पोहोचले. प्राप्त लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या. लसीकरणाच्या शुभारंभासाठी शासनाच्या सूचनेनुसार  करण्यात आला आहे.

अमरावतीत कोरोना लस पोहोचली, पाच केंद्रांवर लसीकरण

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती : कोरोना लस बुधवारी मध्यरात्री अमरावतीला पोहोचली. सध्या सुमारे १६ हजार ७०० लसींचा डोस जिल्ह्याला प्राप्त झाला असून, तो शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. १६ जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ होणार असून, त्यात सर्वप्रथम हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

लस घेऊन येणारे वाहन अकोल्याहून काल रात्री दोन वाजता जिल्ह्यात येऊन पोहोचले. प्राप्त लसी शीतसाखळी केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आल्या. लसीकरणाच्या शुभारंभासाठी शासनाच्या सूचनेनुसार  करण्यात आला आहे. आता पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले यांनी दिली. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, तिवसा येथील ग्रामीण रुग्णालय, अंजनगावबारी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या पाच केंद्रांवर शुभारंभदिनी लसीकरण होईल. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० लाभाथ्र्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी ५०० लाभाथ्र्यांना लस दिली जाईल. याच लाभाथ्र्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक असते. त्यानुसार संबंधित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शुभारंभदिनानंतर शासनाच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील इतर लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होईल, असेही डॉ. रणमले यांनी सांगितले.

हेही वाचा - घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

लसीकरणासाठी यंत्रणा सुसज्ज -
कोरोनाविरुद्ध सगळ्या स्तरांवर जवळजवळ वर्षभर लढाई सुरू आहे. आता हा लढा निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. लस प्राप्त झाल्यामुळे एक महत्त्वाची उपलब्धी झाली आहे. लसीकरणाच्या शुभारंभदिनासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्करचे लसीकरण होणार आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

हेही वाचा -हृदयद्रावक! खेळता-खेळता स्वयंपाकघरात पोहोचली, आई गंSSS ओरडली अन् सोडला जीव

आरोग्ययंत्रणेने केले स्वागत -
कोरोना प्रतिबंधक लस मकरसंक्रांतीच्या पर्वावर येऊन पोहोचली याचा आनंद व्यक्त करीत आरोग्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हॅपी टू व्हॅक्सिनची रांगोळी रेखाटून स्वागत केले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सकाळी लसवाहिका व शीतसाखळी केंद्राची पाहणी केली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

महापालिका क्षेत्रात एकच केंद्र -
महापालिका क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे लसीकरण केंद्र राहणार आहे. मनपा व वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक लसीकरणासाठी तैनात राहणार असल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिली.

loading image