Nagpur News: पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चारा टंचाईची चाहूल; पशुखाद्याचे दर वाढले

Nagpur News
Nagpur Newssakal

संग्रामपूर(बुलढाणा)

Buldhana News: कमी पावसामुळे यावर्षी प्रकल्पातील साठ्यात मोठी घट आली होती. सिंचनासाठी बहुतांश प्रकल्पातून पाणी न मिळाल्याने पिक लागवडीवरही परिणाम झाला. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न गंभीर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयात चारा चंटाईचे चटके जाणवू लागले आहेत.

यावर्षी मार्च महिन्यापासून चाऱ्याच्या टंचाईला सुरवात झाली आहे. यंदा कमी व असमतोल पावसामुळे चारा उत्पादनात घट झालेली आहे. पशुपालकांना चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न बिकट झालेला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीची लागवड केलेली आहे.

Nagpur News
Vidharbha : आधी नुकसान निरंक; आता बाधितांसाठी ७६.३८ कोटींची मागणी

मात्र, याच महिन्यात अवकाळी व वादळाने ज्वारीच्या पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने चाऱ्याचाही दर्जा खालावला आहे. अकोला जिल्हयात पाच लाखावर पशुधन आहे. तर बुलडाणा जिल्हयात साडेसात लाखांवर पशुधन असून या जनावरांसाठी दिवसागणिक चाऱ्याची आवश्‍यकता भासत आहे. खरीप व रब्बी तसेच आताच्या उन्हाळी हंगामातील चारा पावसाळ्यापर्यंत पुरेल. सध्या चाराटंचाई नाही, असे प्रशासन सांगत असून चारा बियाणे वाटपाचाही दावा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.

--परप्रांतिय कळप दाखल--

खरीप, रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन मिळाल्यानंतर अवशेषाच्या रुपात जनावरांना शेतशिवारात चारा उपलब्ध होत असतो. या चाऱ्यासाठी परप्रांतातील जनावरांचे कळप यावर्षी गुजरातसह इतर भागातून मोठ्या दाखल झालेले आहेत. चारा व जनावरांसाठी पाण्याची सोय जेथे होते, अशा शेतशिवारात हे जनावरांचे कळप शेतांमध्ये ‘बैठकी’साठी नेले जातात. ही जनावरे शेतशिवारातील चारा मोठ्या प्रमाणात फस्त करीत असल्याने स्थानिक जनावरांसाठी यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न तयार झालेला आहे.

Nagpur News
Nagpur News : बापरे.. घरात आढळले सव्वीस साप; भिलगाव कामठी येथील घटना

विदर्भ -मराठवाड्याच्या सीमेवर धाड भागात यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या परिसरात चारा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात मका लागवड करीत असतात. मात्र, यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने करडी धरण, पद्मावती, ढालसांगवी धरणासह अनेक लहान मोठ्या प्रकल्पामध्ये अल्प पाणीसाठा उपलब्ध झाला होता. परिणामी महत्त्व पूर्ण असलेल्या मक्याची लागवड ही अतिशय कमी प्रमाणात झाली.

त्यामुळे यावर्षी चाराटंचाई निर्माण झाली. चारा उपलब्ध नसल्याने भाव गगनाला भिडले आहेत. एक एकरातील चाऱ्याची कुटी करुन व्यापारी १५ ते २० हजार रुपयांमध्ये खरेदी करीत आहेत, यावरून चाऱ्याचे दर स्पष्ट होतात.

Nagpur News
Nagpur News : मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध - नितीन गडकरी

--- असे आहेत दर ---

ढेप ः ६० किलो बॅग १८५० रुपये

सुग्रासः ५० किलो १३२०

मका भरडा ः ५० किलो १३००

गायीचे दूध ः दर ३.५ फॅटसाठी २९ रुपये

म्हैस ः ६.० फॅट ४५ रूपये

--ठळक--

- जनावरांच्या बाजारात पशुधनाला दर कमी

- यावर्षी झाला होता सरासरी पाऊस

- प्रकल्पांमध्ये कमी साठ्याचा पीक लागवडीवर विपरीत परिणाम

- परप्रांतीय जनावरांचे कळप दाखल

Nagpur News
Nagpur Corona Update : महिनाभारात कोरोनाचे 4 बळी; कोरोना विषाणूमुळे अजूनही लोकांचे हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com