esakal | अमरावती, अकोला जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये वाढ; आता आठ मार्चपर्यंत संचारबंदी

बोलून बातमी शोधा

Increase in lockdown in Amravati and Akola district Curfew now until March 8}

दुध विक्री सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५ ते ७ पर्यंत सुरू राहील. तसेच सर्वप्रकारची बिगर आवश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. उपहारगृहे, हॉटेल्समध्ये केवळ पार्सल सुविधा असेल. लग्नासाठी पंचवीस व्यक्तींना (वधू व वरासह) मुभा राहणार आहे. यासाठी तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी लागेल.

अमरावती, अकोला जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये वाढ; आता आठ मार्चपर्यंत संचारबंदी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती-अकोला : कोरोनाग्रस्त रुग्णांची दररोजची वाढती संख्या पाहता अमरावती जिल्ह्यातील अमरावती, अचलपूर व अंजनगावसुर्जी शहर तसेच अकोला जिल्ह्यातील अकोला, मूर्तीजापूर आणि अकोट शहरांतील लॉकडाऊनमध्ये वाढ करून ती ८ मार्च करण्यात आली आहे. हा निर्णय स्थानिक जिल्हाप्रशासनाने शनिवारी घेतला आहे.

अमरावतीमध्ये मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरला आहे. मागील २७ दिवसांत एकट्या अमरावती जिल्ह्यात १२ हजार १७४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. त्याला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारीपासून दोन्ही शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याची मुदत सोमवारी १ मार्च रोजी संपणार आहे.

अधिक वाचा - संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?

त्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी अमरावती, अचलपूर शहरातील लॉकडाऊनमध्ये आठ दिवसांची वाढ जाहीर केली आहे. ती आठ मार्चपर्यंत असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये आता अंजनगावसुर्जी शहराचासुद्धा नव्याने समावेश केला आहे. कारण, तेथेही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 

अकोला जिल्ह्यातही वाढ

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने अकोला जिल्हा प्रशासनानेसुद्धा अकोला महापालिका क्षेत्र, अकोट नगरपालिका क्षेत्र व मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये ८ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील.

जाणून घ्या - संजय राठोडांचे नाव घेताच ऊर्जामंत्री सभागृहातून ताडकन उठून पडले बाहेर

दुध विक्री सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ५ ते ७ पर्यंत सुरू राहील. तसेच सर्वप्रकारची बिगर आवश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. उपहारगृहे, हॉटेल्समध्ये केवळ पार्सल सुविधा असेल. लग्नासाठी पंचवीस व्यक्तींना (वधू व वरासह) मुभा राहणार आहे. यासाठी तहसीलदारांकडून परवानगी घ्यावी लागेल.

सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत.

जाणून घ्या - अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांवर नागपूरच्या कंपनीचे नाव, कंपनींच्या अध्यक्षांनी केला मोठा खुलासा

आठ ते दहा दिवस अतिशय महत्त्वाचे
शहरात लॉकडाऊन करणे महत्त्वाचे आहे. कोरोना रुग्णांच्या कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवर विशेष भर दिला जात असून, चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी आयटीआयमध्ये आणखी एक चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा निश्‍चितच सकारात्मक परिणाम दिसेल. मात्र, पुढील आठ ते दहा दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. 
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी, अमरावती