हजारो किलोमीटरवरून पक्ष्यांचे स्थलांतर, पण जाळ्यात अडकून होतोय मृत्यू

migrated birds death due to trapped in net at yavatmal
migrated birds death due to trapped in net at yavatmal

यवतमाळ : जिल्ह्यातील प्रकल्पस्थळी हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी येताच. त्यांचे संवर्धन व अधिवासाचे रक्षण करण्याची जबाबदारी मानवावर आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पक्षी हा सृष्टीतील महत्त्वपूर्ण घटक आहे. याची जाणीवही पुसली जात आहे. प्रकल्पस्थळी मत्सजाळे टाळले जातात. त्यात अडकून दुर्मिळ पक्ष्यांचा मृत्यू होतो. याशिवाय बाजारात विक्री होत असल्याची चिंता पक्षीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात तलाव, धरण येथे स्थलांतरित व स्थानिक स्थलांतरित पक्षी येतात. त्यांचा परतीचा प्रवास मार्च व एप्रिल महिन्यांत सुरू होतो. हे पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर पार करून आपल्या अधिवासात येतात. काही महिने वास्तव्य करतात आणि निघून जातात. पक्ष्यांबद्दल जनजागृतीचा अभाव असल्याने या बाबींकडे कुणीही गंभीरतेने लक्ष देत नाहीत. मारूती चितमपल्ली व डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रथमच राज्यासह जिल्ह्यात पक्षीसप्ताह साजरा केला जात आहे. जिल्ह्यात येणारे पक्षी, त्यांची नावे, ठिकाण, कालावधी यांची सर्व माहिती सप्ताहात संकलित केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 343 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.

बोरगाव, निळोणा, सायखेडा येथील प्रकल्पांवर दुर्मिळ पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांनी केली आहे. निळोणा येथे 72 व बोरगाव येथे 87 पक्षी आढळून आले आहेत. युरेशिया, अमेरिका, युरोपमधून विविध प्रजातींचे 104 स्थलांतरित पक्षी येतात. जिल्ह्यात मत्सव्यवसायातून उपजीविका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मासेमारी करण्यासाठी धरण व तलावात जाळे टाकले जाते. त्यात दुर्मिळ पक्षी अडकतात. त्यांना सोडून न देता, आठवडेबाजारात आणून विक्री केली जाते. ही चिंताजनक बाब आहे. मत्सजाळ्यात अडकल्याने वर्षाला शेकडो दुर्मिळ पक्ष्यांना आपला जीव गमावावा लागतो. पक्षी सप्ताहानिमित्ताने वनविभागाने याबाबत कडक पाऊल उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

भारतीय वन्यजीव कायदा 1972नुसार पक्ष्यांना संरक्षण दिले आहे. त्यांची शिकार, त्यांचे अधिवास, अंड्याचे नुकसान करता येत नाही. पक्ष्यांची शिकार केल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. मानवी जीवनात पक्ष्यांचे महत्त्व लक्षात घेता त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
- केशव वाबळे, उपवनसंरक्षक, यवतमाळ

मत्सजाळ्यात अडकून मृत्यू पडणाऱ्या व विक्री होणाऱ्या पक्ष्यांची संख्या खूब मोठी आहे. वनविभागाने पक्षी सप्ताहानिमित्ताने बैठक घेऊन मत्सव्यावसायिकांना दुर्मिळ पक्षी जाळ्यात आल्यास त्यांची सुटका करावी, असे निर्देश देण्यात यावेत. जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांची बाजारात विक्री होत असल्याची बाब लक्षात आली आहे. ग्राहकांनी दुर्मिळ पक्ष्यांची मागणी करू नये, अशी अपेक्षा आहे.
- श्‍याम जोशी, पक्षीमित्र, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com