वडाळी वीटभट्टी परिसरात टाकली विटांची सुरक्षा भिंत; वादावादीतून झाला खून

Murder in Wadali Vitbhatti area of Amravati
Murder in Wadali Vitbhatti area of Amravati

अमरावती : बिच्छूटेकडीलगत वडाळी वीटभट्टी, एकतानगर परिसरात क्षुल्लक कारणावरून एकाचा खून झाला. त्यात कुटुंबातील दाम्पत्य व तीन मुलींसह एक अल्पवयीन, अशा सहा जणांविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. रविवारी (ता. २०) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतानगर, वीटभट्टी परिसरात चक्रे व कोटांगळे या दोन्ही कुटुंबीयांची घरे समोरासमोर आहेत. दोन्ही घरांच्या मधात आवागमनासाठी अरुंद रस्ता आहे. दोन्ही कुटुंबीयांनी घरासमोर कंम्पाउंड तयार केले असून, कंम्पाउंडचा भाग रस्त्यालगत येतो. या मुद्यावरून दोन्ही कुटुंबांत काही दिवसांपासून वादावादी सुरू आहे.

विनोद हिरामन चक्रे (वय ५०, रा. एकतानगर, वडाळी) हे रात्री घरासमोरून एकटेच येत असल्याचे बघून त्यांना गाठले व कोटांगळे कुटुंबीयांनी काठ्यांसह लाकडी राप्टरने प्रहार केले. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. मध्यस्थी करण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा अश्‍वदीप विनोद चक्रे (वय १५) हा सुद्धा किरकोळ जखमी झाला.

दोन्ही जखमींना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान विनोद चक्रे यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा मुलगा अश्‍वदीप याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी संबंधिताना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाचही जणांना शुक्रवारपर्यंत (ता. २५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

खून, मारहाणीसह ठार मारण्याची धमकी

याप्रकरणी जितेंद्र गुलाबराव कोटांगळे (वय ४८), पत्नी वंदना जितेंद्र कोटांगळे (वय ४२), मुली राणी (वय २४), करिष्मा (२२) व दीक्षा (वय १९) यांच्यासह अल्पवयीन मुलगा (वय १५) यांच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांनी खून, मारहाणीसह ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. अल्पवयीन वगळता उर्वरित पाच जणांना या गुन्ह्यात अटक केल्याचे असे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी सांगितले.

जमावाने मारेकऱ्यांना घेरले

सशस्त्र हल्ल्यात एकाच्या मृत्यूनंतर मारहाण करणाऱ्या कोटांगळे कुटुंबीयांना मृताच्या नातेवाइकांसह नागरिकांनी घेरल्यामुळे राडा झाला होता.

तणाव निवळला
सुरक्षा कंपाउंडचा वाद वाढल्याने त्यातून खुनाची घटना घडली. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन कारवाई केल्याने तणाव निवळला.
- पुंडलिक मेश्राम,
पोलिस निरीक्षक फ्रेजरपुरा ठाणे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com