नागपूरला उन्हाचा चटका! 21 ट्रॅफिक सिग्नल दुपारी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Traffic

नागपूरला उन्हाचा चटका! 21 ट्रॅफिक सिग्नल दुपारी बंद

देशासह राज्यभरात उन्हाचा पार चांगलाच चढलाय. राज्यात अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवत असून याचा भयंकर त्रास सहन करावा लागतोय. गेल्या काही दिवसात राज्यात कडकत्या उन्हामुळे अनेकांचा बळी गेलाय. राज्यातील विदर्भात ही उन्हाने हाहाकार माजवलाय. अशात उपराजधानी नागपूरमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत 21ट्रॅफिकची सिग्नल यंत्रणा बंद ठेवल्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासंदर्भात वाहतूक विभागाचे डीसीपी सारंग आव्हाड यांनी ही माहिती दिली. (As temperature rises in Nagpur Traffic Police decided to off 21 traffic signal from 12 to 4 )

हेही वाचा: नागपूर : ‘साई’च्या जागेवरील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करा- गडकरी

नागपूरमध्ये दुपारी 12 ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत 21 ट्रॅफिकची सिग्नल यंत्रणा बंद राहणार आहे. उन्हाचा होणारा त्रास लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शहरातील सगळ्या सिग्नलसाठी हा नियम लागू नसणार.

हेही वाचा: 'मंदिरातही' कार्यक्रमांना घ्यावी लागणार परवानगी

नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंशांच्या पार गेलं आहे. उन्हाच्या झळा आणि नागपूर शहरातील वाहतुकीचं प्लॅनिंग पाहिलं तर कधी कधी 30 ते 40 सेकंदांपेक्षा जास्त सिग्नल असतो. उन्हामुळे महत्त्वाचं काम असेल तरच लोक घराबाहेर पडतात. त्यात वाहनं चालवणाऱ्यांची संख्या या वेळेत तुरळक असते. त्यातच सिग्नल लागल्यावर तिथे थांबण्याचा कालावधी बऱ्याचदा जास्त असतो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतलाय

Web Title: As Temperature Rises In Nagpur Traffic Police Decided To Off 21 Traffic Signal From 12 To 4

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top