Buldhana News: मध्य प्रदेशातील आरोपींचा महाराष्ट्रात धुडघूस, देशी बनावटीच्या पिस्टल विक्री करणाऱ्या चौघांना अटक

Buldhana Crime News: लोकसभा निवडणुका निःपक्ष आणि मुक्त वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsEsakal

संग्रामपूर (बुलढाणा) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक काळात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांवर बुलढाणा पोलिसांकडून मोठी कार्यवाही करण्यात आली.

यावेळी पोलिसांनी भारसिंग मिसऱ्या, हिरचंद गुमानसिंग उचवारे, आकाश मुरलीधर मेश्राम आणि संदिप अंतराम डोंगरे सर्वजन राहणार मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून देशी बनावटीचे 4 पिस्टल आणि मॅग्झीन जप्त केले. या सर्वांची एकून किंमत 1 लाख 20 हजार इतकी आहे. यासह 17 जिवंत काडतूस, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम 32,370, एक मोटार सायकल असा एकूण- 2 लाख 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकसभा निवडणुका निःपक्ष आणि मुक्त वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

या अनुशंगाने जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या पोलीस स्टेशन सोनाळा, तामगांव, जळगांव जामोद हद्दीमध्ये देशी बनावटीचे पिस्टल, काडतुसे व ईतर हत्यारांची तस्करी, खरेदी विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन, अशांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी संबंधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते.

Buldhana Crime News
Lok Sabha Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसांना जेवण मिळेना?

त्यानुसार 18 एप्रिल रोजी स.पो. नि, चंद्रकांत पाटील-प्रभारी अधिकारी, विनोद शिंबरे, विशाल गवई, मोहिनुद्दीन सैय्यद, राहुल पवार, गणेश मोरखडे, चालक विनायक इंगळे सर्व पो.स्टे. सोनाळा यांचे पथकाला गोपनीय खबर मिळाली की, वसाडी शिवारात ग्राम पचोरी येथून काही लोक येणार असून, ते इतर लोकांसोबत देशी बनावटीच्या पिस्टलचा व्यवहार करणार आहेत.

Buldhana Crime News
Viral Video: आधी लगीन लोकशाहीचं... विवाहाच्या अवघे काही तास आधी तरुण पोहचला मतदान केंद्रावर

सदर गोपनीय माहितीवरुन वसाडी ते हडीयामाल या ठिकाणी सापळा रचत, यातील निमखेडी फाट्याजवळ 4 जणांना पकडून, झडती घेतली असता वरील गोष्टी सापडल्या. सदर प्रकरणी सोनाळा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com