नागपूरकरांनो, अजिबात गाफील राहू नका; रुग्णसंख्या घटली मात्र धोका कायम

नागपूरकरांनो, अजिबात गाफील राहू नका; रुग्णसंख्या घटली मात्र धोका कायम

नागपूर : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं हाहाकार (Coronavirus) माजवला आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune) नंतर नागपुरातही (Nagpur Corona Uodate) कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव आहे. एका दिवसात हजारी नागरिक कोरोनाबाधित होताहेत. मृत्यूच्या संख्याही भयावह आहे. त्यामुळे शहरातील स्मशानभूमीत जागा अपुरी पडू लागली आहे. काही दिवसांआधी असलेल्या या परिस्थितीत आता लक्षणीय सुधारणा होताना दिसतेय. हळूहळू कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे अनेक नागरिक बेफिकीरपणे पुन्हा रस्त्यावर फिरू लागले आहेत. मात्र धोका अजूनही टळलेला नाही. (Careful behavior is still important against corona in Nagpur)

नागपूरकरांनो, अजिबात गाफील राहू नका; रुग्णसंख्या घटली मात्र धोका कायम
बापरे! कोरोना कचरा उचलण्याचा दर १०० रुपये किलो; दररोज २ हजार ५०० किलो कचरा

मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ दिसून आली. त्यामुळे दररोज जिल्ह्यात ८०-१०० मृत्यू होऊ लागले. यामुळे प्रशासनाला नाईलाजानं लॉकडान करण्याची वेळ आली. लॉकडाउन होणार या भीतीनं नागरिकांनी बाजारणामध्ये प्रचंड गर्दी केली. मात्र याचा परिणाम दिसून आला तो कोरोना रुग्णांच्या संख्येत. अचानक नागपुरातील कोरोना रूग्णांचा आकडा फुगला. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे.

गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झालेली बघायला मिळाली. काल म्हणजे रविवारी जिल्ह्यात अवघे ११३३ कोरोना रुग्ण आढळले. दिलासादायक बाब म्हणजे कित्येक दिवसांनी मृत्यूचा आकडा कमी झाला. या सर्व गोष्टी चांगल्या घडत असतील तरी आता गाफील राहून चालणार नाही असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

कोरोना आकडेवारीत आता जरी घट बघायला मिळाली तरी ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. आकडा कमी झालेला बघून नागरिकांनी गाफीलपणा दाखवा तर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास वेळ लागणार नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना हा गाफीलपणा अत्यंत महागात पडू शकतो. त्यात अपुऱ्या सुविधांमुळे अनेकांना पुन्हा जीव गमवावा लागू शकतो. कोरोनाची ही घटती आकडेवारी नक्कीच दिलासादायक आहे. मात्र कोरोनमुक्त होण्यासाठी आपल्या सर्वांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे.

नागपूरकरांनो, अजिबात गाफील राहू नका; रुग्णसंख्या घटली मात्र धोका कायम
प्रेमासाठी वाट्‍टेल ते...! नातीनेच प्रियकराच्या मदतीने केला आजीचा खून

"मला काहीच होत नाही" हे म्हणण्यापेक्षा "मी स्वतः आणि स्वतःमुळे कोणालाच काही होऊ देणार नाही" हे म्हणणं अधिक गरजेचं आहे. दुर्लक्ष न करता पाळा आणि कोरोनाला हरवा असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आलंय.

(Careful behavior is still important against corona in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com