Gadchiroli news :आदिवासी भागातील बालमृत्यू टाळण्यासाठी गाभा समितीची सभा

गरोदर मातेची प्रसूती संस्थेतच होणार, याबाबत जनजागृती करावी.
Gadchiroli news
Gadchiroli newssakal

गडचिरोली : जिल्ह्यातील विशेषत: आदिवासी भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सर्व विभागांचा समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याकरिता शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय गाभा समितीची स्थापना करण्यात आली असून या गाभा समितीची सभा नुकतीच पार पडली.

राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व प्रकल्पस्तरीय गाभा समिती याप्रमाणे या समितीची रचना असून जिल्ह्यात दर तीन महिन्‍यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय गाभा समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेत घेण्यात येते. या सभेला जिल्हास्तरीय गाभा समितीचे सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी जिल्ह्यातील बालमृत्यूबाबत माहिती सादर केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी गरोदरपणातील सर्व सेवा प्रामुख्याने देण्यात याव्या, अशा सुचना दिल्या.

भामरागड तालुक्यातील बालमृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी समन्वय साधून बालमृत्यू कसे कमी करता येतील, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्कता आहे. गरोदर मातेची प्रसूती संस्थेतच होणार, याबाबत जनजागृती करावी.

Gadchiroli news
G-20 Summit: 'दिल्ली बनेगा खलिस्तान'; पाच मेट्रो स्टेशनच्या भितींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा

गरोदर मातांकरिता शासनाद्वारे राबविण्यात येणार्‍या सर्व योजनांचा लाभ गरोदर मातांना १०० टक्के द्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिल्या. जिल्ह्यात ६ वयोगटातील जास्तीत जास्त बालकांना एन. आर. सी. तसेच सी. टी. सी. मध्ये दाखल करण्याबाबत पालकांना प्रवृत्त करावे.

Gadchiroli news
TY च्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं तर ऐकलं, पण विद्यार्थी काय म्हणतायत, वाचा...

याबाबत जनजागृती करावी. बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारण घडवुन आणण्याकरिता प्रयत्न करावे. गावपातळीवर ग्राम बालविकास केंद्राची स्थापना करण्यात यावी, जास्तीत जास्त बालकांचे श्रेणीवर्धन करण्याकरिता प्रयत्न करावे. सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांचे जिल्हास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे.

Gadchiroli news
Nashik ZP School: जि. प. तील शिक्षकांच्या रिक्त पदांवर D. Ed., D. T. Ed. धारकांना मानधनावर घ्या

प्रशिक्षणामध्ये बालकांचे धोक्याचे लक्षण ओळखणे व बालमृत्यु कसे टाळता येतील, याबाबत उजळणी प्रशिक्षण देण्यात यावे. मिशन इंद्रधनुष्य मोहीम ५.० अतंर्गत एकही बालक लसीपासून वंचित राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com