नागपूर प्रशासनाला उशिरा जाग, इतके बळी गेल्यानंतर जम्बो कोविड सेंटरसाठी हालचाली

Covid Center
Covid CenterCanva

नागपूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बेड, उपचाराअभावी रुग्णांचा जीव जात आहे. आता प्रशासनाला जाग आली असून जम्बो कोविड सेंटर तयार करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. शहरात जम्बो कोविड केंद्रासाठी तज्ज्ञ चमूने चाचपणी केली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली.

Covid Center
आशिया खंडातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयाचं शवागार हाऊसफुल्ल

पालकमंत्री राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संबंधित आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद योगेश कुंभेजकर ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर हे उपस्थित होते. शहरातील वाढता कोरोनाचा ताण पाहता कोविड जम्बो सेंटर उभारण्याचे जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील सद्यस्थितीतील बेड संख्या आणि आगामी नियोजन करून अहवाल सादर करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांना सूचना करण्यात आली. सालई गोधनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या परिसरातील रुग्णांसाठी क्षमतेनुसार बेड तयार करण्यास सांगण्यात आले. नागपुरातील व्हेंटीलेटरचा तुटवडा लक्षात घेता विशाखापट्टणम येथील संस्थेने मशिनचे सादरीकरण केले. शहरातील खासगी डॉक्टरांशी देखील त्यांनी संवाद साधला.

Covid Center
१५ दिवसांत तब्बल ३४ मृत्यू! गावात स्मशान शांतता

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत त्यांनी दिले. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना पत्र लिहून अत्याधुनिक क्रिस्पर फेलुदा मशिनची मागणी केली आहे. या मशिनमुळे आरटीपीसीआर चाचणी ३० मिनिटांत येत असल्याने चाचण्या जलदगतीने होतील, असे राऊत यांनी सांगितले.

या ठिकाणांची पाहणी -

मानकापूर विभागीय क्रीडा संकुल, विद्यापीठ परिसर, विद्यापीठातील मैदान, इसआयसी हॉस्पिटल,हज हाऊस या ठिकाणाची पाहणी केली आहे. तसेच याविषयीची प्राथमिक माहिती घेण्यात आली असून लवकरच तज्ज्ञ चमू प्रस्ताव सादर करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com