esakal | रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा, मुस्लिम बांधवांनी जपला माणुसकीचा धर्म

बोलून बातमी शोधा

oxygen cylinder

रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा, मुस्लिम बांधवांनी जपला माणुसकीचा धर्म

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या विस्फोटामुळे शहरात उपचारासाठी उपलब्ध असणारे बेड, व्हेंटिलेटर, औषधे, ऑक्सिजन साऱ्याचाच तुटवडा जाणवत आहे. शासन, प्रशासन साऱ्यांनीच हात टेकल्याचे चित्र आहे. प्रसंग बाका असताना जमात ए इस्लामी हिंदने घरी उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देत गुदमरणाऱ्या जीवांना प्राणदान देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

पैशांअभावी किंवा बेड मिळत नसल्याने अनेक रुग्णांवर घरीच उपचार करून घेण्याची वेळ आली आहे. बरेचदा या रुग्णांना अचानक ऑक्सिजनची गरज भासते. अशावेळी आधिच चिंतेत असणाऱ्या नातेवाईकांना ऐनवेळी धावपळ करावी लागते. जमाअत ए इस्लामी हिंदने गत वर्षीपासूनच कोरोना बाधितांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देणे सुरू केले. जाफरनगरातून जाती- धर्माचा विचार न करता सलेंडर उपलब्ध करुन दिले जातात. आतापर्यंत उपलब्ध असणाऱ्या ६५ सिलेंडरच्या माध्यमातून ही सेवा सुरू होती. पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून त्यात आणखी ३० सिलेंडरची भर घालण्यात आली आहे. हज हाउस, वाडी, भंडारा. गंजीपेठ येथून हे सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहेत.

समाजकंटकांकडून सेवेचा दुरुपयोग -

केवळ डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, आधार कार्ड दाखविताच उपलब्धतेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान सिलेंडर उपलब्ध करून दिले जाते. परंतु, काही सामजकंटकांकडून या सेवेचाही दुरुपयोग केला जात असल्याचा अनुभव आला आहे. यामुळे अॅडव्हान्स स्वरूपात काही रक्कम घेण्यात येत आहे. सिलेंडर परत देताच मोजके शुल्क कापुन संपूर्ण राशी परत दिली जाते.

हेही वाचा: नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर

संपूर्ण शहरातूनच ऑक्सिजनसाठी विचारणा होत आहे. उपलब्धतेनुसार ते उपलब्ध करून देत आहोत. अन्य सामाजिक संस्थांनीही या कार्यासाठी निस्वार्थ भावनेने पुढे येणे आवश्यक आहे. तातडीने अशाप्रकारच्या सेवा मोठ्या प्रमाणात सुरू होणे काळाजी गरज आहे.
डॉ. एम. ए. रशीद, मीडिया सचिव, जमात ए इस्लामी हिंद, नागपूर