Nagpur:रिक्षामध्ये बसल्यावर तरुणाने विद्यार्थिनीशी केले अश्लील चाळे, संतापलेल्या नागरिकांनी ३२ वर्षीय युवकाला दिला चोप

अजनी पोलिस हद्दीत ऑटोत बसून अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीला छेडणाऱ्या ३२ वर्षीय युवकास नागरिकांनी शनिवारी चांगलाच चोप दिली.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal

College Girl Molested in Nagpur: अजनी पोलिस हद्दीत ऑटोत बसून अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीला छेडणाऱ्या ३२ वर्षीय युवकास नागरिकांनी शनिवारी चांगलाच चोप दिली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी त्याला अटक करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

कुणाल अनिल लोंदे (वय ३२ रा. विद्यानगर, नंदनवन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. उच्चशिक्षित असलेल्या कुणालचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून तो एका खासगी कंपनीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता दररोज ऑटोने कॉलेजमधून घरी ये जा करते. जानेवारीत ऑटोने ती घरी यायला निघाली असताना कुणालही ऑटोत बसला. त्याने तिची छेड काढली. विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा ऑटोत बसला. त्याने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. दरम्यान याबाबत विद्यार्थिनीने नातेवाइकांना सांगितले. त्यानुसार नातेवाइकांनी तिला कुणाल ऑटोत बसल्यावर माहिती देण्यास सांगितले. दरम्यान शुक्रवारी (ता.२९) सांयकाळी विद्यार्थिनी ऑटोने घरी यायला निघाली. याचवेळी कुणालही ऑटोत बसला. त्याने विद्यार्थिनीची छेड काढणे सुरू केले. विद्यार्थिनीने नातेवाइकांना व्हॉट्सअॅपवर माहिती दिली.

नातेवाइक मानेवाडा चौकात पोहोचले. ऑटो थांबताच नातेवाइकांनी कुणालला घेरले. मात्र, तो पळू लागला. नातेवाइकांनी आरडाओरड करत पाठलाग केला. काही नागरिकांनी कुणालला पकडले. त्याला चांगलाच चोप दिला. अजनी पोलिसांना माहिती दिली.

Nagpur Crime
VIDEO: सारा करत होती पुण्याचं काम, फोटोग्राफर्स तिथेही आले अन् सैफची लेक भडकली; म्हणाली...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन चामटे, उपनिरीक्षक पंकज बावने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. त्यांनी नागरिकांच्या तावडीतून कुणालची सुटका केली. दरम्यान त्याने मद्य प्राशन केले असल्याची बाब समोर आली. ताब्यात घेत, पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुणालला अटक केली. सध्या तो कारागृहात आहे.

Nagpur Crime
Nitin Gadkari: नितीन गडकरींपेक्षा त्यांची पत्नी तिप्पट श्रीमंत, मुंबईत 2 घरांची मालकीण! एकूण मालमत्ता जाणून घ्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com