Nagpur : झेंडू फुलांनी सजला बाजार

ग्राहकांना दिलासा : दर ग्राहकांच्या आवाक्यात
nagpur news
nagpur newsesakal

नागपूर : दिवाळी सण व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनाला झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. पूजेसह घराला तोरण बांधणे, सजावट, वाहनांना; तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात.

nagpur news
Nagpur : महिलेची संपत्ती हडपण्याचा कट; मन्नत बाबावर गुन्हा

त्यामुळे मागणी लक्षात घेता फुले विक्रीतून चांगली कमाई होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणात विक्रीस पाठवली आहे. रविवारी शहरात १५० ते १६० गाड्या दाखल झाल्या. त्यामुळे फुलांचे दर स्थिरावलेले असून ठोक बाजारात ४० ते ५० रुपये किलो दराने फुले विकली जात आहेत. तर किरकोळ बाजारात झेंडूचा दर हा १२० ते १६० रु. किलोच्या घरात आहे.

nagpur news
Nagpur : आयुर्वेद ही देशाची अस्मिता; चिंतनाची गरज

फूल खरेदीसाठी बाजारात सकाळी पाच वाजतीपासूनच विक्रेते, ग्राहकांनी गर्दी केली होती. घाऊक बाजारात झेंडूच्या फुलांचे दरही चांगले आहेत. शहरातील महात्मा फुले मार्केट फुलले आहे. यंदा लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्थी हे एकाच दिवशी आले आहेत. फूल बाजारात आज फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून बाजार फुलल्याने विक्रेत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

nagpur news
Nagpur : पोषण आहार व्यवहाराची आयकर चौकशी?

मागील दिवाळीला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची विक्री झाली होती. मात्र रविवारी दर गडगडल्याने झेंडू ४० रुपये प्रतिकिलो विकला जात होता. राज्यभरात फुलांचे मुबलक पीक आल्याने आवक वाढली असून झेंडूसह सर्वच फुलांचे दर ऐन दिवाळीत स्थिरावले आहेत. यामुळे ग्राहकांना महागाईत दिलासा मिळाला आहे.

nagpur news
Nagpur : अखेर अतिवृष्टीची रक्कम खात्यात जमा

नवरात्रोत्सव आणि दसऱ्याला फुलांच्या मागणीत वाढ झाली आणि फुलांना चांगला भाव मिळाला. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळाला. दिवाळीतही फुलांना चांगला भाव मिळेल या उद्देशाने लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी झेंडूसह विविध फुलांची मोठय़ा प्रमाणावर आवक झाली.

nagpur news
Nagpur : दिवाळी पहाट’ला स्वरांची मेजवानी

परिणामी झेंडू, शेवंती आदी फुलांचे भाव गडगडले. गेल्या वर्षी दिवाळीत झेंडू १०० रुपये किलो विकला गेले. यंदा ठोक बाजारात चांगल्या प्रतीचे झेंडू फूल ४० ते ५०, तर लहान आकाराचा झेंडू फूल ४० रुपये किलो आहे. एरवी शंभरी पार असणारी शेवंती १२० रुपये किलोने उपलब्ध होती. किरकोळ बाजारात २०० रुपये किलो आहे.

nagpur news
Nagpur : कुलगुरू डॉ. चौधरींवर माफी मागण्याची नामुष्की

महात्मा फुले फूल बाजारात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने किरकोळ ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये. यंदा दर कमी असल्याने आपल्या परिसरातील विक्रेत्यांकडून फुलांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- जयंत नारनवरे, अध्यक्ष, महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com