Ramtek Loksabha: रामटेकमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीची झळ, काँग्रेसचा उमेदवार वंचितच्या गोटात

रामटेक लोकसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे.
Congress
Congress Esakal

Ramtek Loksabha Rebel Candidates: रामटेक लोकसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या उत्साह संचारला आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी आंबेडकरांच्या आवाहनाला साद घातली. आज वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे वंचितच्या वतीने भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनी उमेदवारी दाखल केली.

किशोर गजभिये मागील निवडणुकीत रामटेकमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. त्यावेळी सावनेरचे माजी आमदार सुनील केदार आणि माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांचा उघडपणे विरोध केला होता. राऊत बंडखोरी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखलसुद्धा झाले होते. राहुल गांधी यांनी फोनवरून आपणास उमेदवारी दाखल करण्यास सांगितल्याचा दावा त्यावेळी राऊत यांनी केला होता.(Latest Marathi News)

सुनील केदार यावेळी त्यांच्यासोबत होते. मात्र शेवटपर्यंत राऊतांचा एबी फॉर्म नागपूरमध्ये पोहोचलाच नाही. केदारांनी निवडणुकीत गजभिये यांना साथ दिली नाही. त्यामुळे बंडखोरी टळली. यावेळी इच्छुकांच्या यादीत गजभिये यांचे नाव आघाडीवर होते. मात्र सुनील केदार यावेळी रश्मी बर्वेंसाठीच आग्रही होते. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने फक्त बर्वे यांचेच नाव पाठवण्याचा आग्रह केदार यांनी धरला होता. त्यांच्या हट्टासमोर कोणाचेच काही चालले नाही. याचाच वचपा घेण्यासाठी यावेळी गजभिये यांनी बंडखोरी करून दंड थोपटल्याचे दिसते.

Congress
Nashik Lok Sabha Constituency : 9 खासदारांना मिळाली 50 टक्क्यांपेक्षा अधिक पसंती! कवडे यांना सर्वाधिक 74 टक्के मतदान

साखरेंचे बंडाचे निशाण

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक सुरेश साखरे यांनीसुद्धा रामटेकमधून बंडाचे निशाण फडकावले. शिवसेनेचा खासदार असतानाही रामटेक काँग्रेससाठी सोडल्याचा त्यांचा रोष आहे. ते स्वतः रामटेकमधून उत्सुक होते; मात्र आघाडीच्या वाटाघाटीत काँग्रेसने बाजी मारली. (Latest Marathi News)

Congress
Fact Check: पंतप्रधान मोदी खरंच आरक्षणाच्या विरोधात बोलले होते का? वाचा व्हायरल व्हिडिओमागील सत्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com