नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेची निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे निर्देश दिल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपच्या काही नेत्यांनी मनपा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची परस्पर घोषणा केली आहे..राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट)तडकाफडकी पक्षाची बैठक घेऊन ४० जागांवर कुठल्याही परिस्थितीत लढणारच असा एकमताने ठराव केला. हे बघता जागा वाटपावरून महायुतीत संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत..राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात बैठक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. कुठल्या प्रभागांमध्ये लढल्यास जिंकण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कुठेकुठे आहे याची माहिती घेण्यात आली..चर्चेअंती ४० जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एकमताने ठराव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विदर्भाचे संपर्क नेते राजू जैन यांना पाठवण्यात येणार आहे..लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. नागपूरमध्ये आम्ही दोन जागांची मागणी केली होती. त्या दिल्या नाही. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत आम्ही चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.