गडचिरोली : हत्तींची लढाई आता न्यायालयात

केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाला नोटीस; कायदेतज्ज्ञ सरोदे, अ‍ॅड. रामटेके यांचा पुढाकार
Elephant
Elephant sakal
Summary

केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाला नोटीस; कायदेतज्ज्ञ सरोदे, अ‍ॅड. रामटेके यांचा पुढाकार

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागाअंतर्गत कमलापूर वनपरिक्षेत्रातील(Kamalapur Forest Reserve area ) शासकीय हत्ती कॅम्पमधील हत्ती गुजरातच्या जामनगर(gujarat jamnagar) येथील खासगी प्राणिसंग्रहालयात पाठविण्याच्या निर्णयाविरोधात विरोध होत असताना आता हा मुद्दा थेट न्यायालयात जाणार आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोद(adv assem sarode) व अ‍ॅड. बोधी रामटेके यांनी गडचिरोलीतील(gadchiroli) हत्ती स्थलांतराविरोधात केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाला (Union Ministry of Environment and Forests) कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Elephant
केस कापल्यावर रक्त का येत नाही? घामाला दुर्गंध कसा येतो?

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कमलापूर हत्ती कॅम्प हा महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पातानील या ठिकाणीसुद्धा काही हत्तींचा अधिवास आहे. जिल्ह्यातील हत्तींना गुजरात येथील रिलायन्स कंपनीच्या खासगी प्राणी रेस्क्यू सेंटर येथे पाठविण्यात येत आहे. हे हत्तींचे स्थलांतरण प्राणी हक्कांविरोधात असून स्थानिकांना निर्माण होणाऱ्या उपजीविकेवरसुद्धा गदा आणणारे आहे, असे सांगत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे व अ‍ॅड. बोधी रामटेके यांच्या माध्यमातून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. सात दिवसांत समाधानकारक उत्तर न आल्यास व स्थलांतर थांबविण्यासाठी कुठलीही हालचाल न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये नमूद आहे. अनेक वर्षांपासून कमलापूर, पातानील या ठिकाणी हत्तींचे वास्तव्य आहे. प्राणी आपला अधिवास निश्चित करत असतो. अशावेळी पूर्णपणे रमलेल्या हत्तींना खासगी संग्रहालयात पाठविल्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

Elephant
जवळच्या लोकांची संपत्ती वाढवण्याचे काम सुरु; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

संपूर्ण जिल्ह्यातून या हत्ती स्थलांतरणाविरोधात मोहीम सुरू झाली आहे. संविधानातील अनुच्छेद २१ नुसार प्राण्यांनासुद्धा चांगले आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचे उल्लंघन रोखण्यासाठी हे स्थलांतर रद्द करून त्या ठिकाणी रिक्त पदे भरावी, अशी मागणी अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनात नोटीसच्या माध्यमातून केल्याचे अ‍ॅड. बोधी रामटेके यांनी सांगितले आहे. रेस्क्यू सेंटर किंवा संग्रहालयात अशा प्राण्यांना पाठविण्यात येतात जे जंगलात अनाथ सापडले आहेत किंवा जे दिव्यांग आहेत. कमलापूर येथील हत्ती पूर्णपणे सुदृढ आहेत. सुदृढ प्राण्यांना जंगलातून बंदिस्त, बनावट अशा ठिकाणी घेऊन जाणे हा प्राण्यांचा छळ असून प्राणी हक्कांच्या विरोधात आहे, असे ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे व अ‍ॅड. बोधी रामटेके यांनी सांगितले आहे.

Elephant
शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवणाऱ्यांना मतदान करू : टिकैत

समस्यांवर स्थलांतर हा उपाय नाही...

कमलापूर (kamlapur) येथील हत्तींची प्रकृती सतत बिघडत असते. त्यांना सांभाळायला योग्य स्टाफ नाही. हत्ती प्रशिक्षित नाहीत असे कारण देत स्थलांतर करण्यात येत आहे. पण, या समस्यांवर स्थलांतर हा उपाय नाही. एकीकडे हा शासकीय कॅम्प आहे. विविध कायद्यात, नियमावलीत शासकीय हत्ती कॅम्पसंदर्भातील (elephant camp) नियम दिलेले आहेत. प्रत्येक कॅम्पमध्ये माहुत, प्रशिक्षक, वैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. परंतु यावर भर न देता, रिक्त असलेली पद न भरता स्थलांतरण करणे चुकीचे आहे, असे ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे(adv aseem sarode) व अ‍ॅड. बोधी रामटेके यांनी नोटीसमध्ये(legal notice) म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com