esakal | एमएचसीईटी होणार सर्कलस्तरावर; कोरोनाकाळात विद्यार्थ्यांसाठी ठरणार लाभदायी
sakal

बोलून बातमी शोधा

एमएचसीईटी होणार सर्कलस्तरावर;  विद्यार्थ्यांसाठी लाभदायी

एमएचसीईटी होणार सर्कलस्तरावर; विद्यार्थ्यांसाठी लाभदायी

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी एमएचसीईटी १६ जुलैपासून (MHCET from 16th July) घेण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. प्रवेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची परीक्षा असल्याने यावेळी प्रथमच परीक्षा तालुक्याऐवजी सर्कलस्तरावर (At circle level instead of taluka) घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार (Students will be relieved) आहे. (udya-samant-said-MHCET-will-be-at-the-circle-level)

राज्यात दरवर्षी अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी एमएचसीईटीचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेत संपूर्ण राज्यातून साडेतीन लाखावर विद्यार्थी नोंदणी करतात. त्यासाठी ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महाविद्यालयात परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात येते. मात्र, यंदा राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

हेही वाचा: साहेबऽऽ बॉम्ब बनविणाऱ्यांवर कारवाई करा; १५ जूनपर्यंत कोठडी

वाढता संसर्ग लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उच्च व तंत्रशिक्षण विभागावर एमएचसीईटी निर्विघ्नपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेच यावेळी परीक्षा केंद्र वाढविण्यावर विभागाचा भर आहे. त्यातूनच यावेळी विद्यार्थ्यांसाठी सर्कलस्तरावर परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दुजोरा दिला. उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षात उद्योगांमध्ये नोकरीची संख्या रोडावली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात देशामध्ये तीन लाखापेक्षा अधिक या अभ्यासक्रमातील जागांची संख्या घटली आहे. असे असताना, यावेळी बारावीच्या सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे रिक्त जागांमध्ये बऱ्याच प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

हेही वाचा: ‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे!’ मुलाने केली आत्महत्या

गेल्यावर्षी चाळीस हजारांवर जागा रिक्त

राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमात अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंटला पसंती दर्शविली जाते. मात्र, गेल्या पाच वर्षात अभियांत्रिकी शाखेतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचे चित्र आहे. याउलट फार्मसी, आर्किटेक्चर शाखेमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येत आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या १ लाख ३४ हजार ३५६ जागांपैकी ८० हजार जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे पन्नास हजारावर जागा रिक्त राहिल्या होत्या.

हेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

असलेल्या जागा

अभियांत्रिकी - १,३४,३५६

फार्मसी - ५१,७३७

आर्किटेक्चर - १,१४६

हॉटेल मॅनेजमेंट - १,२५२

(udya-samant-said-MHCET-will-be-at-the-circle-level)

loading image