esakal | भाजीपाला महागला! टोमॅटो, पालक, गवार शेंगा खाताहेत भाव
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीपाला महागला! टोमॅटो, पालक, गवार शेंगा खाताहेत भाव

जुलै महिन्यात उत्पादन कमी होत असते. त्यामुळे टोमॅटोचे दर वाढलेले आहेत.

भाजीपाला महागला! टोमॅटो, पालक, गवार शेंगा खाताहेत भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर: टाळेबंदीच्या वेळेच्या बंधनामुळे भाजीची मागणी आणि आवक कमी असल्याने भाज्यांचे भाव चढ्या स्थितीत स्थिरावलेले आहेत. जुलै महिन्यात उत्पादन कमी होत असते. त्यामुळे टोमॅटोचे दर वाढलेले आहेत.

हेही वाचा: नागपूर : तरुणाने बाईकसह घेतली तलावात उडी

सध्या बहुतांश मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर सध्या किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये प्रति किलो या पातळीवर गेले असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हे उत्पादन नाशवंत असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकविता येत नाही. देशभरातून उपलब्ध होत असलेल्या माहितीनुसार सध्या विविध शहरांमध्ये टोमॅटोचे दर ७० रुपयांपर्यंत वाढले आहेत. ज्या राज्यात टोमॅटोचे उत्पादन होते त्या राज्यातही टोमॅटोचे दर वरच्या पातळीवर आहेत. याशिवाय पालकासह भेंडी, गवार शेंगाचे भावही वाढलेले आहेत. बाजारात ५० ते ६० गाड्यांची आवक झाली. ती मागणीच्या तुलनेत कमी आहे.

हेही वाचा: नागपूर : वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघे सुदैवाने बचावले

शहरात स्थानिक शेतकऱ्यांकडून आवक बंद झाली असून सध्या टोमॅटोची आवक संगमनेर आणि बंगळूरू येथून सुरु आहे. पावसाळ्यात दरवर्षीच जुलै ते सप्टेंबर या कालावधीत टोमॅटोचे उत्पादन कमी असल्याने भाव वाढलेले असतात, असे अडतिया भाजी संघटनेचे सचिव राम महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा: नागपूर : सरसकट निर्बंध उठवणं महागात पडणार?

ठोक बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)

- कोथिंबीर - २० रुपये

- गवार शेंग - ५० रुपये

- मेथी - ८० रुपये

- हिरवी मिरची - ५० रुपये

- फणस - ४० रुपये

- चवळी - ३० रुपये

- वांगे - २० रुपये

- फुलकोबी - ४० रुपये

- पानकोबी १५ रुपये

- टोमॅटो - ३० रुपये

- भेंडी - ४० रुपये

- शिमला मिरची - ५० रुपये

- तोंडले - ३० रुपये

- कारले - ३० रुपये

- कोहळा - ४० रुपये

- दुधी भोपळा - १५ रुपये

- पालक - ४० रुपये

- पडवळ - ४० रुपये

- मुळा - २० रुपये

- ढेमस - ४० रुपये

- गाजर - ४० रुपये

loading image