ग्रामस्थांच्या लसींवर शहरवासियांचा ताबा, गावांमध्ये असंतोषाचे वातावरण

Corona vaccinations
Corona vaccinationsEsakal

अमरावती : लसीकरणावरून (vaccination) सध्या जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. लसीकरण नोंदणीच्या (vaccination registration) तांत्रिक बाबींचा फायदा घेत शहरी नागरिकांनी ग्रामीण भागातील आरोग्यकेंद्रांकडे (village health center) धाव घेत लस घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. याचा कुठल्याही क्षणी स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (people from city goes to village for vaccination in amravati)

Corona vaccinations
धोक्याची घंटा : मुलांसाठी ५ हजार खाटांची गरज; तिसऱ्या लाट थोपविणे गरजेचे

लशींच्या तुटवड्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी निर्माण झाली आहे. लसीकरण केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा दिसू लागल्या असून शासनाने आता लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली. मात्र, ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांकडे ऍण्ड्रॉइड मोबाईल फोनच उपलब्ध नाही. असले तर तांत्रिक बाजू कळत नसल्याने त्यांची नोंद होत नाही. मात्र, दुसरीकडे शहरातील नागरिक प्रामुख्याने युवकांनी लसीकरण नोंदणीमध्ये आघाडी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळते. शहरी नागरिकांकडून नोंदणी झाल्यानंतर ते थेट ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्र गाठून तेथे लशी घेताहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागामध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. आरोग्य विभागाने मात्र कानावर हात ठेवले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 25 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे कोव्हॅक्‍सिनचे डोस उपलब्ध नसल्याने हजारोंच्या संख्येने पहिला डोस घेणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. जिल्हास्तरावरून याबाबतच्या सूचना देण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नागपूर व विदर्भातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

Corona vaccinations
आमचा वाली कोण? आइस फ्रूट, सरबत विक्रेते हतबल; उपचारासाठी पैसे नाहीत

कारच्या लांबच लांब रांगा -

ग्रामीण भागात कधी नव्हे एवढी चारचाकी वाहने सकाळपासूनच दिसायला लागली आहेत. याचे कारण म्हणजे अमरावतीवरून थेट नागरिक आपल्या वाहनांनी कुटुंबीयांसमवेत ग्रामीण भागातील आरोग्यकेंद्रांवर दाखल होत असून तेथे त्यांचे लसीकरण होत आहे.

तांत्रिक अडथळ्यांची शर्यत -

ऑनलाइन लसीकरणासाठी साईट उघडण्याची वेळ निश्‍चित नसते. केव्हा ती रात्री 11 ला तर केव्हा पाच वाजता उघडते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. नोंदणी करेपर्यंत साठा संपल्याचे दाखविण्यात येते. आरोग्य विभागाकडे याबाबतचे तंत्रज्ञ नसल्याने हा अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Corona vaccinations
मृतदेह बदलल्याने संतापाचा उद्रेक; मोक्षधामात उघडकीस आला प्रकार

गर्दी हटेना, लस मिळेना -

शहरातील काही मोजक्‍याच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, मात्र नोंदणी केलेले तसेच रांगेत उभे राहणारे नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करीत असल्याने संपूर्ण नियोजनच कोसळल्याचे चित्र दिसून येते. गर्दी हटेना, लस मिळेना, अशी सध्याची परिस्थिती दिसून येते.

लशींच्या कार्यक्रमात सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था केली आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी नोंदणी आवश्‍यक आहे. ग्रामीण व शहरी, अशी स्वतंत्र व्यवस्था नाही.
-डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com