नागरिकांनो सावधान! सोशल मीडियावर आता कोरोना लसही 'टार्गेट', तुम्हीही बळी ठरत नाही ना?

rumors about corona vaccine on social media
rumors about corona vaccine on social media

नागपूर : कोरोना विषाणूनंतर आता लसीबाबतही विविध अफवा पुढे येत असून नेहमीप्रमाणे सोशल मीडियावरून संभ्रम पसरविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या वापरातून अफवांच्या माध्यमातून गोंधळ निर्माण करण्यात येत असल्याचेही चित्र आहे. 

भारतात कोव्हॅक्सीन, कोव्हीशिल्ड या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. या परवानगीसोबत कोरोना लसीबाबत सोशल माध्यमात विविध अफवा वेगानं पसरत आहेत. पुणे, नाशिकनंतर नागपूर परिसरातही कोरोना लसीबाबत अफवा पसरल्या जात असल्याचा निष्कर्ष सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे यांनी काढला आहे. कोरोना व्हॅक्सिनमध्ये डुकराची चरबी आहे, कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिनची प्रभावी आणि सुरक्षित साठवणुकीसाठी डुकराचे मास वापरण्यात आले आहे, स्वित्झर्लँडमध्ये औषध कंपनी नोवाटिरसने डुकराचं मास वापरून मॅनिंजाईटिस लस तयार केली यासह कोरोना लसीकरण नोंदणीबाबत अफवा आणि यातून फसवणूक, अ‌ॅलर्जी असलेल्या लोकांना लसीकरण, अशा अनेक अफवांच्या पोस्ट सोशल मीडियात दिसून येत आहे. एवढेच नव्हे अशा प्रकारचे मेसेजही फिरत आहेत. नागरिकांत संभ्रम पसरविणाऱ्या असे मेसेज, पोस्टवर विश्वास न करता केवळ सरकारी यंत्रणेच्या मेसेजवर विश्वास करावा, असे आवाहन पारसे यांनी केले आहे. या मेसेज, पोस्टवर नागपूर सायबर सेल पोलिसांची नजर असली तरी नागरिकांनी या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लसीच्या उपयुक्ततेवर, परिणामकारकतेवर आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अफवा पसरविले जात असल्याचे पारसे यांनी नमूद केले. कोव्हॅक्सिनची मानवी चाचणी घेणारे डॉ. प्रशांत रहाटे यांनीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा - ‘तुम्हीच सांगा काय चूक होती आमची? आईला बघण्याआधीच कायमचे मिटावे लागले डोळे
 
सोशल मीडियावर पोस्ट तसेच मेसेजमधून लसीबाबत अफवा पसरविण्याची मोहीम सुरू आहे. लसीकरण थेट आरोग्याशी निगडित विषय असल्यामुळे गोंधळ उडणार नाही, याबाबत नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे. नागरिकांनी अफवा पसरवणाऱ्यांबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना दिली पाहिजे. 
-अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com