Video : सुनील केदार म्हणाले, विकासाच्या आड राजकारण येऊ देणार नाही 

Sunil Kedar said, politics will not be allowed to stand
Sunil Kedar said, politics will not be allowed to stand

वर्धा : 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला समाजातील सर्व लोक एकत्र येऊन जल्लोष करतात. परंतु, जल्लोष करीत असताना या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव ठेवून नागरिकांनी काम करावे. अधिकारासोबतच कर्तव्याला सुद्धा तेवढेच महत्त्व द्यावे. जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासाच्या आड कोणतेही राजकारण येणार नाही याची काळजी घेणार असल्याचे पशु संवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार म्हणाले. 

जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे आदी उपस्थित होते. 

महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती देश-विदेशात साजरी होत असताना वर्धा जिल्ह्याला मिळालेल्या बहुमानाच्या या संधीचे सोन करावे. जिल्ह्यातील सर्व संस्था, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या कर्तव्याचे पालन करून महात्मा गांधींना कार्यातून आदरांजली द्यावी, असे आवाहन पालकमंत्री सुनील केदार यांनी केले. यावेळी सुनील केदार यांनी परेड निरीक्षण करून सर्व स्वातंत्र संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र अभिवादन करून उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. 

शिवभोजन योजना राज्यातील उत्कृष्ट योजना ठरेल

गोर-गरीब माणूस उपाशी राहू नये आणि त्याला योग्य पोषक आहार मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन योजना सुरू केली आहे. आज त्याचा शुभारंभ वर्धेसोबतच राज्यात झाला आहे. राज्यातील व जिल्ह्यातील गरिबातील गरीब व्यक्तीला अगदी अल्प दरात भोजन मिळावे हा उद्देश या योजनेमुळे निश्‍चित साध्य होईल. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली शिवभोजन योजना राज्यातील उत्कृष्ट योजना ठरेल असा विश्‍वास पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला. 

दोन केंद्रांची निवड

शिवभोजन योजनेअंतर्गत जिल्ह्याला शासनाने दोनशे थाळीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यासाठी शिवभोजन जिल्हा समितीमार्फत दोन केद्रांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक केद्राला शंभर थाळीचे उदिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये आनंदी स्वयसहायता महिला बचत गट यांचे सामान्य रुग्णालय परिसरात तर सत्कार भोजनालयाचे वतीने रेल्वे स्टेशन येथे केद्र सुरू करण्यात आहे. 

यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पथसंचलन केले. पोस्टल ग्राउंड येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात विद्यार्थ्यांनीसुद्धा परेडमध्ये हिरहिरीने सहभाग नोंदविला. पालकमंत्री संजय राठोड यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला यवतमाळकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com