कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

बँकेत गेला असता जुने कर्ज माफ झाले नाही व नवीन कर्ज मिळणार नाही, असे त्याला बँक व्यवथपकाने सांगितले होते.

यवतमाळ : येथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरी येथे विषारी द्रव्य पिऊन कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. ८) सकाळी उघडकीस आली. ज्ञानेश्वर दत्तुजी नेवारे (वय 48) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

ती अल्प भू-धारक शेतकरी असून ६ आक्टोबरला कर्ज माफ झाले की नाही, हे पाहण्यासाठी भाम्ब (राजा) येथे बँकेत गेला असता जुने कर्ज माफ झाले नाही व नवीन कर्ज मिळणार नाही, असे त्याला बँक व्यवथपकाने सांगितले होते. तर शेतातील सोयाबीन पावसाने खंड दिल्याने हातचे गेले.

कपाशींवर बोंडअळी आली. त्यामुळे पिके मातीमोल झाली आहेत. शेतातील ज्वारी वण्यप्राण्यांनी फस्त केली. तर खासगी कर्जाचे डोंगर वाढत असल्याने विवंचनेनेच त्याने आपली जीवनयात्रा संपवली. त्याच्या मागे वृद्ध आई, पत्नी, दोन मुले आहेत. याची त्वरित दखल घेऊन शासनाने नेवारे कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: yavatmal news debt ridden farmer commits suicide