Raj Thackeray Uddhav Thackeray एकत्र येणार, Worli Dome मध्ये काय तयारी? | Mumbai News | Sakal News

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijay Melava: त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्यानंतर ठाकरेसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार, वरळी डोममध्ये ऐतिहासिक सभा सकाळी ११.३० वाजता..

सरकारने त्रिभाषा धोरणावरील जीआर रद्द केल्यानंतर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) संयुक्तपणे विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे. हा ऐतिहासिक मेळावा मुंबईच्या वरळी डोम येथे पार पडणार आहे. या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल सोळा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या भेटीकडे प्रचंड उत्सुकतेने पाहिलं जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज सकाळी 11.30 वाजता वरळी डोम येथे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला येणाऱ्यांना कोणताही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन न येण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे. त्रिभाषा धोरणाविरोधातील संघर्षात मिळालेल्या यशानंतर ठाकरे बंधूंच्या एकत्रित उपस्थितीमुळे या मेळाव्याला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व लाभलं आहे. मेळाव्याला काय काय तयारी केली बघा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com