Viral Satya : सावधान! अति अंडी खाल्ल्याने होतो मृत्यू? (Video)

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

अंडी खाल्ल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. मस्करी मस्करीत 50 अंडी आणि एक दारूची बॉटल पिण्याची पैज लावली. मात्र, हीच पैज व्यक्तीच्या जीवावर बेतलीय. 42 वं अंडं खात असताना व्यक्ती बेशुद्ध पडली. त्याला हॉस्पिटलला नेलं पण, त्याला मृत घोषित केलं.

अंडी खाल्ल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. मस्करी मस्करीत 50 अंडी आणि एक दारूची बॉटल पिण्याची पैज लावली. मात्र, हीच पैज व्यक्तीच्या जीवावर बेतलीय. 42 वं अंडं खात असताना व्यक्ती बेशुद्ध पडली. त्याला हॉस्पिटलला नेलं पण, त्याला मृत घोषित केलं. पण, जास्त अंडी खाल्ल्यामुळं मृत्यू होतो का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अंडी खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या जौनपूर भागात घडलीय. सुभाष यादव या व्यक्तीने मस्करीत 50 अंडी खाण्याची पैज लावली होती. सुभाष यादवांनी जास्त अंडी खाल्ल्यानं त्यांचा मृत्यू झाला का? याची आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेतला.

एकामागोमाग अंडी खाल्ल्याने त्याचा परिणाम शरीरावरती होतो. त्यामुळंच मृत्यू झाल्याचं आहारतज्ज्ञांनी सांगितलं. आपण सगळेजण अंडी खातो...त्यामुळं अंडी खाताना काय काळजी घ्यायला हवी तेदेखील तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

- अंडं हे सर्वात जास्त पौष्टीक आहे
- अंडे योग्य प्रमाणात खाल्लं तर शरीराला याचा उपयोग होतो
- शरीरात कोलेस्टेरॉल जास्त असल्यास तज्ज्ञांना विचारून अंडी खावीत
- अंडी खाताना व्यवस्थित चावून खावीत
- अंडी चावून खाल्ली नाहीत तर त्याचा परिणाम आतड्यांवर होतो
- पटापट अंडी खाल्ल्याने हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो

अंडं सर्वात जास्त पौष्टीक आहे. त्यामुळं अंडी खाल्ली पाहिजेत. पण, पटापट अंडी खाल्ल्यानं आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं अंडी खाताना सावधगिरी बाळगा.

Viral Satya : मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा जपून (Video)

Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video)

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)

Viral Satya : नारळ उतरवण्याची माकडाला ट्रेनिंग (Video)

Viral Satya : एलआयसीमधले पैसे बुडणार? (Video)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Video Eating too much eggs causes death