Viral Satya : सोनसाखळी चोरांना महिलेनं दाखवला इंगा (Video)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं चोराचा हात पकडला  आणि या चोराला बाईकवरून खाली पाडलं. चोराला पकडून ठेवल्यानं आजूबाजूचे लोकही जमा झाले. बघा, या चोराला या महिलेनं पकडून ठेवलं. पण, आपलंही काय खरं नाही म्हटल्यावर त्याचा साथीदार बाईक सोडून पळत होता. मात्र, या चोरालाही लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला.

एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग कमी केला आणि काय केलं पाहा. बाईकवर मागे बसलेल्या चोरानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं चोराचा हात पकडला  आणि या चोराला बाईकवरून खाली पाडलं. चोराला पकडून ठेवल्यानं आजूबाजूचे लोकही जमा झाले. बघा, या चोराला या महिलेनं पकडून ठेवलं. पण, आपलंही काय खरं नाही म्हटल्यावर त्याचा साथीदार बाईक सोडून पळत होता. मात्र, या चोरालाही लोकांनी पकडून चांगलाच चोप दिला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या दोन्ही चोरांना लोकांनी पकडून पकडून मारलं. जमावानं दोघांना बेदम चोप दिला. पुन्हा चोरी करताना हे दोघेही 100 वेळा विचार करतील अशीच शिक्षा या लोकांनी दिली. हे दोघेही चोर सराईत आहेत, चोरी करताना आपली ओळख कळू नये म्हणून डोक्यात हेल्मेट घातलंय. पण, महिलेच्या धाडसामुळं यांचा चोरीचा प्लॅन फसला आणि दोघेही लटकले. ही धक्कादायक घटना मागील महिन्यात घडलीय. पण, आता हा व्हिडीओ व्हायरल करून सोनसाखळी चोरांपासून सतर्क राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. त्यामुळं अशा सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा.

Viral Satya : मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करा जपून (Video)

Viral Satya : घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! (Video)

Viral Satya : वाघिणीसाठी भिडले दोन वाघ ! (Video)

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

Viral Satya : जम्पिंग कारचा थरार ! (Video)

Viral Satya : नारळ उतरवण्याची माकडाला ट्रेनिंग (Video)

Viral Satya : एलआयसीमधले पैसे बुडणार? (Video)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Video Gold chain thief