Viral Satya : ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्या बाईकस्वाराला पकडलं (Video)

traffic police issuing memo to cycle rider for breaching traffic rules
traffic police issuing memo to cycle rider for breaching traffic rules

ट्रॅफिकचे नियम तोडले तर ट्रॅफिक पोलिस कारवाई करतात. त्या दिवशीही ट्रॅफिक पोलिस आपली ड्युटी बजावत होते. त्याचवेळी एक बाईकस्वार विना हेल्मेट बाईक चालवत होता. पुढे ट्रॅफिक पोलिस उभे असल्यानं या बाईकस्वारानं काय केलं पाहा. कारवाई होईल या भीतीनं त्यानं बाईक मागे वळवली आणि पळण्याचा प्रयत्न केला. पण, ट्रॅफिक पोलिसानं या बाईकस्वाराला पकडण्याचा प्रयत्न केला. बाईकस्वारानं बाईकचा वेग वाढवल्यानं बाईकस्वार या ट्रॅफिक पोलिसाच्या तावडीतून सुटला. पण, या बाईकस्वाराला पकडताना ट्रॅफिक पोलिस रस्त्यावर पडला आणि फरफटत गेला. यामुळं ट्रॅफिक पोलिस गंभीर जखमी झालाय.

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. ही घटना गुजरातच्या वडोदरामध्ये घडलीय. 500 रुपयांचा दंड द्यावा लागेल म्हणून बाईकस्वारानं पळ काढला. पण, पोलिसांनी बाईकस्वाराला पकडून त्याच्यावर कारवाई केलीय. तर बाईकस्वाराला पकडणारा ट्रॅफिक पोलिस गंभीर जखमी झालाय.

या सर्व प्रकारानंतर बाईकस्वार रिकीन सोनीवर कारवाई झाली. त्यामुळं त्याच्या वडिलांनी रस्त्यावर उतरुन कारवाईचा निषेध केला. पण, रिकीन सोनीला पकडताना ट्रॅफिक पोलिस गंभीर जखमी झाल्यानं सोनीवर कारवाई करण्यात आलीय. त्यामुळं ट्रॅफिकचे नियम तोडू नका, ट्रॅफिकचे नियम पाळा आणि प्रवास सुखरुप करा.

**************************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com