Panda Nanny Job
esakal
Panda Nanny Job
चीनमध्ये पांडा सांभाळण्यासाठी खास नोकरी दिली जाते. या कामाला 'पांडा नॅनी' असं म्हणतात.
Panda Nanny Job
या नोकरीसाठी दरमहा साधारण २.५ लाख रुपये पगार मिळत असल्याचं सांगितलं जातं. राहणं, जेवण आणि गाडीची सुविधाही दिली जाते.
Panda Nanny Job
लहान पांडांना एकटं वाटू नये म्हणून त्यांच्यासोबत खेळणं आणि त्यांची काळजी घेणं हे या नोकरीतलं मुख्य काम आहे.
Panda Nanny Job
पांडांना वेळेवर दूध पाजणं, त्यांना बांबू आणि इतर पौष्टिक खाद्य देणं ही जबाबदारीही सांभाळावी लागते.
Panda Nanny Job
पांडा जिथे राहतात ती जागा स्वच्छ ठेवावी लागते. त्यांचे पिंजरे आणि परिसर नियमित साफ करावा लागतो.
Panda Nanny Job
पांडांचं वजन तपासणं, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं आणि आजारांची लक्षणं दिसल्यास त्याची नोंद करणं आवश्यक असतं.
Panda Nanny Job
या कामासाठी प्राणीशास्त्र किंवा पशुवैद्यकीय शिक्षणाचा अनुभव उपयोगी ठरतो. पांडांबद्दल माहिती, संयम आणि प्राण्यांची काळजी घेण्याची आवड असणंही महत्त्वाचं आहे.
Shinchan Real Village