एअर इंडियाच्या 'या' प्रवाशांना केवळ शाकाहारी जेवण!

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

"इकॉनॉमी क्लासमधून नव्वद मिनिटांचा देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना यापुढे केवळ शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.", असे एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी म्हणाले.

मुंबई: आता एअर इंडियाच्या लहान पल्ल्याच्या प्रवासात केवळ शाकाहारी जेवण मिळणार आहे. नव्वद मिनिटांपर्यंतचा प्रवास करणाऱ्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांसाठी कंपनीने हा नियम काढला आहे. यामागे प्रमुख हेतू खर्च कमी करण्याचा तसेच शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सरमिसळ होऊ नये हा आहे.

"इकॉनॉमी क्लासमधून नव्वद मिनिटांचा देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना यापुढे केवळ शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.", असे एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी म्हणाले.

मात्र, सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांमधील बिझनेस आणि एक्झिक्युटिव्ह क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मांसाहारी जेवणाची सेवा सुरु राहणार आहे. याशिवाय, तसेच, 90 मिनिटांपेक्षा अधिक काळ देशांतर्गत प्रवास असणाऱ्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांनादेखील जेवणाबाबत शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन पर्याय मिळणार आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे जरी कंपनीवरील कर्जाचा भार कमी होणार नसला तरीही सुमारे सहा ते सात कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज आहे. याआधी, लहान पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना शाकाहारीऐवजी मांसाहारी जेवण मिळाल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळेही कंपनीने हा निर्णय घेतला.

इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांच्या जेवणाबाबत याआधीदेखील वेळोवेळी बदल केले आहेत. गेल्यावर्षी, कंपनीने 61 ते 90 मिनिटांचा प्रवास असणाऱ्या विमानांमध्ये केवळ गरम शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रवाशांना चहा आणि कॉफी देण्याचा निर्णय रद्द झाला होता. तसंच त्यापेक्षा कमी काळ प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ शाकाहारी नाश्ता आणि सँडविच(शाकाहारी आणि मांसाहारी) देण्याचा नियम काढण्यात आला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
सरताज अझीझ यांनी माझ्या पत्राची दखलही घेतली नाही: स्वराज
पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व मुलाची हत्या​
तांत्रिक कारणामुळे 'एनएसई'वरील व्यवहार बंद
नौगाम सेक्टरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार
बोट बुडण्यापूर्वी फेसबुकवर केले Live; दोघांचा मृत्यू, 6 बेपत्ता
डेक्कन क्वीनला 1 तास उशीर; प्रवाशांचे आंदोलन
ड्रॅगनची नजर ‘कोंबडीच्या माने’वर​
पुरुषाने दिला मुलीला जन्म​
सिन्नर तालुक्यात शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या​
भूमाफियांमुळे नेवाळी आंदोलनाला हिंसक वळण- आमदार गायकवाड​

मुजोर रिक्षाचालकांविरोधात डोंबिवलीकरांचे 'प्रोटेक्ट अगेन्स्ट रिक्षावाला“
बिल्डर जगदीश वर्मा हत्या प्रकरण; आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता​
विंडिजकडून भारताचा दारुण पराभव; लुईसचे शतक​