बेळगावः गणेश मंडळाना परवाने पोलिस ठाण्यांमधून देण्याचा निर्णय

मल्लिकार्जुन मुगळी
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

बेळगाव : यंदा गणेशोत्सव मंडळाना आवश्यक सर्व परवाने पोलिस ठाण्यांमधून देण्याचा महत्वाचा निर्णय आज (मंगळवार) महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बेळगाव शहरात बारा पोलिस ठाण्यांमध्ये यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बेळगावच्या पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यानी गणेशोत्सव पूर्वतयारी बैठकीत ही माहिती दिली.

शहरात 370 गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळाना मंडप उभारणी, तात्पुरती वीज जोडणी, ध्वनीक्षेपकासाठी महापालिका, हेस्कॉम व पोलिस ठाण्यांमधून परवाना घ्यावा लागतो. यासाठी आधी महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा उपलब्ध करून दिली जात असे. पण पूर्वतयारी बैठकीत पोलिस ठाण्यांमधून परवाने दिले जावेत अशी मागणी झाली. या मागणीला पोलिस उपायुक्त लाटकर यानी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिवाय 16 ऑगस्ट पासूनच ही सुविधा शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल असेही त्या म्हणाल्या.

या निर्णयामुळे यंदा शहरात 12 ठिकाणी एक खिडकी सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागणार नाही. या 12 ठिकाणी पोलिस, महापालिका, हेस्कॉम व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्मचारी नियुक्त केले जातील.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :