दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचा जवान जखमी

वृत्तसंस्था
रविवार, 9 जुलै 2017

त्रालमधील अरीबल येथील सीआरपीएफच्या चौकीवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रेनेड फेकले. ग्रेनेडच्या स्फोटात एक जवान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 1 जवान जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालमधील अरीबल येथील सीआरपीएफच्या चौकीवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रेनेड फेकले. ग्रेनेडच्या स्फोटात एक जवान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

या ग्रेनेड हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुऱहाण वणी याला शनिवारी ठार मारून एक वर्ष झाले. त्यानिमित्त काश्मीर खोऱ्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या चौकीवर हल्ला केला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:
भंडारदरा धरणात मुंबईतील तरुण बेपत्ता​
धुळे: टँकरद्वारे पिकांना पाणी; पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल​
दिव्यांगाच्या जीवनात शिक्षणाची बहार!​
कॉंग्रेस सरकारमधील शिक्षणमंत्री बरे होते : आदित्य ठाकरे​
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा रद्द; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला धक्का​
'इंदू सरकार'वर कॉंग्रेसचा आक्षेप​
'लोक'शाही की 'एक'शाही? (संजय मिस्कीन)​
इस्राईलशी मैत्रीपर्व (श्रीराम पवार)​
#स्पर्धापरीक्षा - हरित भारत अभियान​

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017