गोवाः मटकाप्रकरणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते कवळेकर यांची चौकशी

विलास महाडिक
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

कार्यालयातील मटका व्यवहारसंदर्भात माहिती नसल्याची जबानी

पणजी (गोवा): बेतूल-केपे येथील कार्यालयावरील छाप्यावेळी सापडलेल्या मटका जुगार साहित्यप्रकरणी चौकशीला गोवा काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर आज (शुक्रवार) गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहिली. सुमारे सव्वा तासभर घेण्यात आलेल्या चौकशीवेळी त्यांनी ते कार्यालय त्यांचा भाऊ बाबल कवळेकर याच्या ताब्यात असून तेथील व्यवहाराबद्दल मला काहीच माहीत नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, आमदार कवळेकर यांना आज सकाळी 11 वाजता रायबंदर येथील सीआयडी क्राईम बँचमध्ये चौकशीला उपस्थित येण्याचे समन्स काल बजावले होते. ते वेळेवर न येता दुपारी पावणेएकच्या सुमारास कार्यालयात दाखल झाले. कार्यालयात आत जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी कोणतीही चूक केलेली नाही व माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी मडगाव येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला. त्या अर्जावरील सुनावणी येत्या सोमवारी 25 सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. अंतरिम जामीन मिळाल्यावर ते चौकशीला सामोरे गेले. सुमारे सव्वातास त्यांची चौकशी तपास अधिकाऱ्यांनी केली. मात्र, या मटका जुगार प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: goa news Congress's Leader of the Opposition chandrakant Kavalekar inquiry