पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 30 जुलै 2017

पुलवामातील तहाब भागात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा रक्षकांना या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक जवान जखमी झाला आहे.

पुलवामातील तहाब भागात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा रक्षकांना या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यांच्याजवळील एके47 रायफल्स आणि स्फोटके जप्त करण्यात आल्या आहेत. या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या परिसरात अद्याप शोधमोहिम सुरु असून, नाकाबंदी करण्यात आली आहे. बडगाम जिल्ह्यात 12 जुलैला झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सतत सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघऩ सुरु असून, शनिवारी रात्री पुँचमधील चौक्यांवर गोळीबार करण्यात आला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :