चित्रकूटमध्ये काँग्रेसचा भाजपवर दणदणीत विजय

वृत्तसंस्था
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

जागा राखण्यात काँग्रेसला यश

भोपाळ : चित्रकूट विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून, यामध्ये काँग्रेसने जागा राखण्यात यश मिळवले आहे. काँग्रेसच्या निलांशू चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाळ त्रिपाठी यांचा तब्बल 14 हजार मतांनी पराभव केला आहे.  

चित्रकूट विधानसभेचे काँग्रेसचे आमदार प्रेमसिंह यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. गेल्या 20 वर्षांत काँग्रेसने केवळ एकदा 2008 साली ही जागा गमावली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सुरेंद्रसिंह गहरावार यांनी सिंह यांना पराभूत केले होते. मात्र, सिंह यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी काँग्रेसकडून निलांशू चतुर्वेदी तर भाजपकडून शंकर दयाळ त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली होती. विधानसभेच्या या जागेसाठी 9 नोव्हेंबरला मतदान घेण्यात आले होते. यात 65 टक्के मतदान पार पडले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. 

निलांशू चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाळ त्रिपाठी यांचा पराभव केला. निलांशू यांना 68,810 तर त्रिपाठी यांना 52, 677 मते मिळाली. दरम्यान, चित्रकूट हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, ही पोटनिवडणुक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रचार केला होता. 

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :