'एसीबी'च्या गैरवापराबद्दल सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी

वृत्तसंस्था
रविवार, 20 ऑगस्ट 2017

करंदजले म्हणाले, की एसीबीची स्थापना करून राज्य शासनाने लोकायुक्त कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक लोकायुक्तावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण असते.

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी) गैरवापर केल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

विरोधी पक्षनेते बी. एस. येडुरप्पा यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक आणि खासदार शोभा करंदलजे यांचा समावेश आहे.

येथे पत्रकारांशी बोलताना करंदजले म्हणाले, की एसीबीची स्थापना करून राज्य शासनाने लोकायुक्त कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक लोकायुक्तावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण असते. खऱ्या अर्थाने एसीबी ही स्वायत्त संस्था नाही. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण असते आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्याचा उपयोग विरोधकांना लक्ष्य करीत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी केला, असा आरोप त्यांनी केला. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात येडुरप्पा यांनी एकूण तीन हजार 546 एकर पैकी 257 एकर जमिनीवरील सरकारचा ताबा सोडला होता, त्यामुळे एसीबीने आपल्या प्राथमिक अहवालात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :