'ट्राय जंक्‍शन'मध्ये बदलाचा चीनचा डाव: सुषमा स्वराज

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

नवी दिल्ली: भूतानला मदतीला घेऊन "ट्राय जंक्‍शन' (भारत, चीन व भूतान यांच्या सीमा एकत्र येतात तो भाग) बदल करण्याचा चीनचा एकतर्फी डाव असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले.

नवी दिल्ली: भूतानला मदतीला घेऊन "ट्राय जंक्‍शन' (भारत, चीन व भूतान यांच्या सीमा एकत्र येतात तो भाग) बदल करण्याचा चीनचा एकतर्फी डाव असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले.

प्रश्‍नोत्तराच्या तासातील पुरवणी प्रश्‍नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, "ट्राय जंक्‍शन' येथील सीमांबाबत भारत, चीन आणि भूतान हे तिन्ही देश एकत्रित निर्णय घेतील, असा करार 2012 मध्ये झालेला आहे. भारत व चीनमधील सीमारेषेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही देश यावर चर्चा द्विपक्षीय पद्धतीने यावर निर्णय घेतील. त्याचप्रमाणे चीन व भूतानही सीमेबाबतच्या मुद्‌द्‌यावर द्विपक्षीय चर्चा करतील.''

"चीनने या भागात रस्ते बनविण्यास सुरवात केल्याचा आरोप करून भूतानने चीनकडे याचा लेखी निषेध नोंदविला आहे. या संदर्भात भारताची भूमिका अवास्तव नसून, सर्व देश भारताच्या पाठीशी असून, कायदाही आपल्या देशाला अनुकूल आहे,'' असे स्वराज यांनी सभागृहात सांगितले. ""हा प्रश्‍न चर्चेने सोडविला जाऊ शकतो. आम्ही चर्चेला तयार आहोत; पण त्यापूर्वी दोन्ही देशांनी त्यांचे सैन्य या भागातून मागे घेतले पाहिजे,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: