पैशांवरून आईशी भांडण; दहावीतील मुलाची आत्महत्या

अमोल टेंबकर
शनिवार, 24 जून 2017

रितेश विलास म्हाडेसर (वय 16) असे या मुलाचे नाव आहे. तीन हजार रूपयांसाठी त्याने आपल्या आईशी भांडण केले. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने शेजारच्या जुन्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

सावंतवाडी - चराठे वझरवाडीतील दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाने आईसोबत पैशांवरून भांडण झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रितेश विलास म्हाडेसर (वय 16) असे या मुलाचे नाव आहे. तीन हजार रूपयांसाठी त्याने आपल्या आईशी भांडण केले. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने शेजारच्या जुन्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली. तत्पूर्वी रितेशने आपल्या परिसरातील विहिरी उडी टाकली होती. मात्र पोहता येत असल्याने बुडला नाही. मग विहिरीच्या दोरी तोडून ओल्या कपड्याने जुन्या घरात जाऊन जीवन संपविले. 

याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रितेशचे वडील विलास म्हाडेसर यांचा तीन वर्षांपूर्वी शेतात हृदयविकाराने मृत्यू झाला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
जयपूर पोलिसांच्या पोस्टर्समुळे बुमराहची नाराजी​
चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी
काश्‍मीर:मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यास ठेचून मारले​
एकत्र आले ठाकरे, फडणवीस, गडकरी आणि नारायण राणे
"सुपर' श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत !
भारत-विंडीज सामन्यात पावसाची बॅटींग​
‘सकाळ’सारखी रचनात्मक, सकारात्मक पावले गरजेची - कारमॉन​
#स्पर्धापरीक्षा - जागतिक बॅंकेचा हवामान बदलासंबंधीचा कृती आराखडा​
वादग्रस्त कामांवरून महाजन, सवरांमध्ये जुंपली​

टॅग्स