सावंतवाडीः पुलावर पाणी आल्याने सभापतीसह अधिकारी अडकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सावंतवाडीः चौकुळ (ता. सावंतवाडी) येथील कापईवाडी या पुलावर पाणी आल्याने पंचायत समिती सभापतीसह सर्वच प्रशासकीय अधिकारी तब्बल एक ते दीड तास अडकले.

आज (बुधवार) साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर काही वेळाने पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर सर्व प्रशासन मार्गस्थ झाले.

सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा आज चौकुळ येथे आयोजित करण्यात आली होती. दरवर्षी एक सभा शहराच्या बाहेर घेण्यात येते. त्यानुसार आजची सभा आंबोली पासून दहा किलोमीटरवर असलेल्या चौकुळ मध्ये घेण्यात आली होती. मात्र, सभा संपल्यानंतर परतत असताना हा प्रकार घडला. यावेळी सभापती रवींद्र मडगावकर, उपसभापती निकीता सावंत यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :