मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

जगभरातील क्रीडा क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या मेस्सी बरीच वर्षे अँटोनेलासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यांना दोन मुले आहेत. अखेर शुक्रवारी रात्री ते दोघे विवाहबद्ध झाले. त्या विवाहासाठी दिग्गज वऱ्हाडी उपस्थित होते.

रोसारिओ - आधुनिक फुटबॉलचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी बालपणीची मैत्रीण अँटोनेला रोकुझ्झोबरोबर विवाह बंधनात अडकला. 

जगभरातील क्रीडा क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या मेस्सी बरीच वर्षे अँटोनेलासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्यांना दोन मुले आहेत. अखेर शुक्रवारी रात्री ते दोघे विवाहबद्ध झाले. त्या विवाहासाठी दिग्गज वऱ्हाडी उपस्थित होते. त्यामध्ये मेस्सीचा बार्सिलोनातील सहकारी गेरार्ड पिके आणि त्याची पत्नी पॉप स्टार शकिराचाही समावेश होता.

मेस्सी अर्जेंटिनाचा असला तरी त्याचे फुटबॉल विश्‍व स्पेनमधील बार्सिलोना क्‍लब हे आहे. त्यामुळे स्पेनच्या संघातील अनेक दिग्गज फुटबॉलपटू विवाह सोहळ्याला उपस्थित होते. बार्सिलोनातील त्याचे सहकारी ब्राझीलचा नेमार, लुईस सुआरेझ असे एकूण २५० पर्यंत वऱ्हाडी उपस्थि होते. काही दिवसांपूर्वीच ३० वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मेस्सीला दोन मुले आहेत. ४ वर्षीय थियागो आणि एका वर्षाचा मॅटिओ अशी त्यांची नावे आहेत. लग्नसोहळ्यासाठी अँटोनेलाने जगप्रसिद्ध स्पॅनिश डिझायनर रोसा क्‍लाराने तयार केलेला ड्रेस परिधान केला होता. क्‍लाराने हॉलिवूड स्टार इवा लोंगोरिया आणि सोफिया वर्गेरा यांच्यासह स्पेनची राणी लेतिझिया यांच्या ड्रेसचे डिझाइन केलेले आहेत. या लग्नसोहळ्यासाठी जगभरातील १५५ पत्रकारांनाही निमंत्रण देण्यात आले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक

पुतनामावशीची कणव
'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!​
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ
असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​
भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​
‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​
'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​