#स्पर्धापरीक्षा - लिंक्‍ड इन (LinkedIn)

टीम ई सकाळ
बुधवार, 5 जुलै 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  http://sakalpublications.com वर तसेच Amazon वर पुस्तके उपलब्ध आहेत

जगातील सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टने दि. 12 जून 2016 रोजी प्रोफेशन नेटवर्किंग साइट लिंक्‍ड इन विकत घेतली. या व्यवहारासाठी मायक्रोसॉफ्टने तब्बल 26.2 अब्ज डॉलर मोजले आहेत. विशेष म्हणजे लिंक्‍ड इनच्या प्रत्येक शेअरला 196 डॉलर्स इतका भाव मिळाला आणि ही संपूर्ण रक्कम रोखीत दिली जाणार आहे.

2011 मध्ये 'स्काइप' (Skype) आणि 2013 मध्ये 'नोकिया' (Nokia) कंपनी ताब्यात घेणाऱ्या मायक्रोसॉफ्टने आतापर्यंत अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीच्या आठ कंपन्या खरेदी केल्या आहेत; परंतु या सर्वांमध्ये 'लिंक्‍ड इन' ही सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे. सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा व्यवहार ठरणार आहे.

'लिंक्‍ड इन' यापुढेही स्वतंत्र ब्रॅंड म्हणून कायम राहणार असून, लिंक्‍ड इनचे 'जेफ वेनर' हेच कायम राहणार असून त्यापुढे ते सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखाली काम करतील.

लिंक्‍ड इनचा स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास

 • 2003: 'रिड हाफमन' (Reid Hoffman) यांनी 2002 च्या अखेरीस सोशलनेट Socialnet) आणि पेपाल (Paypal) या कंपन्यांमधील जुन्या साथीदारांना नवीन कल्पना सुचविण्यासाठी नेमले. 6 महिन्यांनंतर लिंक्‍ड इन लॉंच करण्यात आली. सुरुवातीला प्रतिसाद अत्यल्प. दिवसाला जेमतेम 20 नवीन वापरकर्ते.
 • 2005: 'लिंक्‍ड इन'ने 'जॉब्स ऍण्ड सबस्क्रिप्शन ही बिझनेस लाईन केली. 3 वर्षांत कंपनीने चौथ्या ऑफिसमध्ये कारभार थाटला.
 • 2006: पब्लिक प्रोफाईल सुविधेची सुरुवात, त्याचा कंपनीला मोठा फायदा
 • 2007: 4 वर्षे रीड यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धुरा सांभाळली. त्यानंतर रीड यांनी बाजूला होत 'डॅन ने' (Dan Nay) यांच्याकडे कंपनीची सूत्रे दिली.
 • 2008: लंडनमध्ये कंपनीचे कार्यालय सुरू. साईटचे स्पॅनिश आणि फ्रेंच व्हर्जन सुरू.
 • 2009: 'जेफ विनर' (Jeff Weiner) यांनी लिंक्‍ड इनचे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली, 'लिंक्‍ड इन'चे ध्येयधोरण, व्यावसायिक व्यूहरचनात्मक धोरण यावर भर देत कारभारात स्पष्टता आणली.
 • 2010: वर्षाच्या अखेरीस कंपनीचे 9 कोटी सदस्य.
 • 2011: 'लिंक्‍ड इन'ने आपला आठवा वर्धापनदिन साजरा करताना न्यूयॉर्क शेअर बाजारात नोंद केली.
 • 2012: 'प्रोजेक्‍ट इनोव्हेशन' आणि 'ट्रान्सफॉर्मेशन'साठी मोठा वाव ठेवत साईटची फेरबांधणी केली. 'सिम्प्लीफाय' (Simplify), ग्रो (Grow), एव्हरीडे (Everyday) या संकल्पनांवर कंपनीने भर दिला.
 • 2013: 'लिंक्‍ड इन' दहा वर्षांचे झाले
 • 2014: 'लिंक्‍ड इन' चे दुसरे शतक 'डिजिटल इकॉनॉमी'वर भर देणारे ठरणार असल्याचे कंपनीकडून घोषित.
 • 2016: 'मायक्रोसॉफ्ट'ने 'लिंक्‍ड इन' खरेदी केली.

आकडेवारीत 'लिंक्‍ड इन'

 • 10 वर्षे: लिंक्‍ड इनचे आयुष्य
 • 43 कोटी: सदस्य संख्या
 • 10: जगभरातील कार्यालय
 • 2 सदस्य: प्रतिसेकंदाला वाढणारी लिंक्‍ड इनची सदस्य संख्या

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

#स्पर्धापरीक्षा - डोनाल्ड ट्रम्प

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्प

#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण

#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली

#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'

#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना

#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना