काँग्रेसला दलबदलू लोकांची गरज नाही: अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असे संधिसाधू नेते किंवा नगरसेवक गेले तरी कॉंग्रेसच्या विचारांवर फरक पडणार नाही. उलट नव्या चेहऱ्यांना उत्तम संधी मिळेल.

मुंबई : काँग्रेस सोडून ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. अशा दलबदलू लोकांची पक्षाला गरज नाही. असे संधिसाधू पक्षांतर करीत असतील तर काँग्रेसमध्ये नवे नेतृत्वही उभे राहील, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत असलेल्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना सुनावले. 

काँग्रेसमधील काही बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, "काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असे संधिसाधू नेते किंवा नगरसेवक गेले तरी कॉंग्रेसच्या विचारांवर फरक पडणार नाही. उलट नव्या चेहऱ्यांना उत्तम संधी मिळेल.'' 

दरम्यान, काँग्रेसने नवीन कार्यकारिणी व युवक काँग्रेसची नव्याने रचना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य व जिल्हा कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. पक्षसंघटनेत सुमारे 50 टक्के नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे दिसत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :