झोका खेळताना भिंत कोसळली; बहीण-भाऊ मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अन्य बहीण जखमी, इतर दोन भांवडे बालंबाल बचावले 

औरंगाबाद : झोका खेळताना पाच भांवडांच्या अंगावर भिंत पडून दोन बहीण-भावाचा मृत्यू झाला; तर त्यांची एक बहीण जखमी झाली. ही घटना रविवारी (ता. 20) दुपारच्या सुमारास वाळुज जवळील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली. यात त्यांच्या इतर दोन बहिणी बालंबाल बचावल्या. मुंजाजी सुरेश घाटगिळे (12) आणि रमा सुरेश घाटगिळे (6) अशी मृतांची नावे आहेत. 

परभणी जिल्ह्यातील गोपा (ता. गंगाखेड) येथील सुरेश भानुदास घाटगिळे हे त्यांच्या कुटुंबीयांसह रांजणगावातील दत्तनगरामध्ये शब्बीर अमीनखान पठाण यांच्या खोलीत चार वर्षांपासून भाड्याने राहतात. त्यांना एक मुलगा व चार मुली असे पाच अपत्य आहेत. पठाण यांच्या दुमजली घराच्या खालच्या मजल्यावर घाटगिळे राहत असून, वरचा मजल्यावरील एक खोली रिकामी आहे. त्यामुळे रविवारी दुपारी घाटगिळे यांची पाचही मुले वरच्या खोलीत साडीचा झोका बांधून खेळत होती.

मुलांनी झोक्‍याचे एक टोक खोलीच्या खिडकीला व दुसरे टोक घरातील भांडे ठेवण्यासाठी बांधलेल्या सातफुटी फडताळ्याला (भिंतीतील कपाट) बांधले होते. झोक्‍यामुळे हादरा बसून फडताळ्याची भिंत मुलांच्या अंगावर पडली. यात मुंजाजी आणि रमा ही भांवडे जागीच ठार झाली तर श्रद्धा (8) नावाची त्यांची अन्य बहीण जमखी झाली. या घटनेत सरगम सुरेश घाटगिळे (10) व संध्या सुरेश घाटगिळे (4) या मुली बालंबाल बचावल्या. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, अमोल देशमुख, हेडकॉस्टेबल जी. के. कोंडके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात