औरंगाबादः गुलमंडीत पुजा साहीत्य विक्री दुकानासह गोडावूनला आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

औरंगाबाद: औरंगाबादेतील गुलमंडीत पूजेचे साहीत्य विक्रीचे दुकान व गोदामाला आग लागल्याची घटना गुरूवारी (ता. 2१) मध्यरात्री घडली. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आगीत सुमारे तीन लाखांच्या मालाचे नुकसान झाले.

औरंगाबाद: औरंगाबादेतील गुलमंडीत पूजेचे साहीत्य विक्रीचे दुकान व गोदामाला आग लागल्याची घटना गुरूवारी (ता. 2१) मध्यरात्री घडली. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आगीत सुमारे तीन लाखांच्या मालाचे नुकसान झाले.

दत्तात्रय गाजबरे (रा. पुंडलीकनगर) यांचे गुलमंडीतील सुपारी हनुमान येथे कुमकूम सेंटर नावाने पुजेचे साहीत्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानामागे साहीत्य ठेवण्याचे गोडावून आहे. दसरा दिवाळी निमीत्त गाजभरे यांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला होता. गुरूवारी रात्री बाराच्या सुमारास दुकानातून धुर येत असल्याचे तेथील नागरीकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती अग्नीशमन दलाला दिली. घटनेची माहिती समजताच गाजभरे यांनी दुकान गाठले. दरम्यान, नागरीकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरक्षिततेचा उपाय म्हणून दुकानाच्या वर असलेले अपारमेंटमधील रहिवाशांना बाहेर काढून अग्नीशामक दलाच्या जवानांनी अपार्टमेंट रिकामे केले. सुमारे तीन तासात आग आटोक्यात आणली गेली.

घटनास्थळी क्रांतिचौक पोलिस तसेच सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर दाखल झाले. आगीत दुकान व गोडावूनमधील अंदाजे तीन लाखांचे साहीत्य जळाल्याचे समोर आले. इन्हर्टरमध्ये झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या घटनेची नोंद सिटीचौक पोलिस ठाण्यात झाली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :